Devendra Fadnavis Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis's Masterstroke : सीएम फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! पडद्यामागील शिष्टाई यशस्वी; पहिल्याच बैठकित जरांगेंचा होकार

Fadnavis political strategy : मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरु होते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारसमोरील अडचणी वाढल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरु होते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारसमोरील अडचणी वाढल्या होत्या. ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यातच या आंदोलनामुळे मुंबईकरांना होत असलेल्या त्रासावरून मुंबई उच्च न्यायालयाने कठोर मत व्यक्त केले होते.

दुसरीकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा अखेर यशस्वी झाली आणि जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पडद्यामागील भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे त्यांनी तयार केलेल्या मसुद्याला पहिल्याच बैठकित जरांगेंनी होकार दिला.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadanvis) त्यांचे ऐकत नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी टार्गेट केले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच मराठा आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याचवेळी पाहिल्या दिवसापासूनच सर्व सूत्रे हातात घेत फडणवीस यांनी पडद्यामागे राहून अचूक नियोजन केले. फडणवीस यांनी आंदोलनादरम्यान वैयक्तिक टीका त्यांच्यावर झाली. त्यानंतरही संयम राखत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कायदेशीर तयारीत घेतला पुढाकार

मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन सुरू असतानाच कायदेशीर बाबींवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीसोबत 4 बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने एक ठोस मसुदा तयार केला गेला. प्रत्येक संभाव्य निर्णयासाठी जीआर तयार ठेवण्यात आला होता. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरच मंत्रिमंडळ उपसमितीला चर्चेसाठी पाठवण्यात आले.

परिपूर्ण मसुदा तयार केला

आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्यात आले, त्यांच्यावर अनेक शिवीगाळ झाली, परंतु त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. कोणताही तोल न गमावता त्यांनी आपले नियमित कार्यक्रम सुरू ठेवले. फडणवीस यांनी तयार केलेला मसुदा इतका परिपूर्ण होता की, आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना तो पहिल्याच बैठकीत मान्य करावा लागला. त्यामुळे चर्चेच्या अनेक फेऱ्या कराव्या लागल्या नाहीत आणि वेळ वाचला.

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस यांनी पडद्यामागे केलेल्या शिष्टाईला अखेर यश आले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी फडणवीस यांनी तयार केलेल्या मसुद्याला मनोज जरांगे पाटील यांनी होकार दिला आहे. त्यामुळे, राज्यात सुरू असलेला तणाव कमी झाला आहे.

मनोज जरांगे यांनी थेट फडणवीस यांच्यावर टीका करत आंदोलन तीव्र केले होते. मात्र, फडणवीस यांनी या टीकेला थेट प्रत्युत्तर न देता शांतपणे पडद्यामागे सूत्रे हलवली. त्यांनी आपले विश्वासू सहकारी आणि मराठा समाजातील काही प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. या शिष्टाईत आंदोलकांच्या मुख्य मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

नेमका काय आहे मसुदा?

फडणवीस यांनी तयार केलेल्या मसुद्यात मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. यात ‘सगेसोयरे’ (नातेवाईक) अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, आणि मराठा तरुणांना तातडीने नोकरी आणि शिक्षणात सवलती देणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. हा मसुदा जरांगे पाटील यांच्या वकिलांना दाखवण्यात आला, आणि त्यानंतर त्यांनी यावर सहमती दर्शवली.

दुसरीकडे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवात त्यांनी दरवर्षीप्रमाणे सहभाग नोंदवला. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. वाहिन्यांवरील गणपती आरतीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने चुकीचा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. त्यांच्या या यशस्वी वाटाघाटींमुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राज्याच्या इतिहासात अधिक मजबूत झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT