Maratha Morcha Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange agitation: सीएम फडणवीसांची 'तिरकी चाल' यशस्वी; जरांगेंच्या कोअर टीममधील वकिलाच्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट!

Fadnavis political strategy News : राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जीआरवरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांनी राज्य सरकारकडे आठ मागण्या केल्या होत्या. त्यापैकी सहा मागण्या मान्य केल्याने आंदोलकांनी गुलाल उधळला. मात्र, याबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जीआरवरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता राज्य सरकारची 'तिरकी चाल' यशस्वी झाली, असे विधान टीम जरांगेमधील वकील योगेश केदार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले. त्यांच्या या विधानामुळे मराठा आरक्षण प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन केले. त्यांच्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. त्यातच राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. मात्र, याविषयी टीम जरांगेमधील वकील योगेश केदार यांनी परखडपणे मत व्यक्त केले आहे.

मनोज जरांगे यांच्यासारखा इमानदार आंदोलक आजपर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासात पहिला नाही. ते कधीच मॅनेज होणार नाहीत अथवा कसल्याच मोहाला बळीदेखील पडणार नाहीत. त्यांना राज्यातील महायुतीचे सरकार ज्या तिरक्या चाली खेळत आहे, ते त्यांना समजत नाहीत. ते खूप प्रामाणिक आहेत. घरदार सोडून गेल्या दोन वर्षांपासून समाजासाठी ते आंदोलन करीत आहेत. त्यांनी मराठा समाजाला एकत्र आणले आहे. त्यांची विल पॉवर खूप चांगली आहे. त्याच जोरावर ते मोठमोठ्या राजकीय व्यक्तींना अंगावर घेतात, असे एका प्रश्नाला उत्तर देताना योगेश केदार यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर मोठी वैचारिक लढाई लढवावी लागणार आहे. कायदयाची लढाई लढून समोरच्या व्यक्तींना त्याच भाषेत उत्तर द्यावे लागणार असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले. सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह या राजकीय मंडळींची तिरकी चाल ओळखता येणे गरजेचे होते. ते माझ्या लक्षात आल्याने मी या 'जीआर'च्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे सांगत आहे. त्यामध्ये 'पात्र' व्यक्तीना असा शब्द आला होता. विरोध होत असल्याने हा शब्द जीआरमधून दोन दिवसापूर्वी हटवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनामुळे आक्रमक झालेल्या मराठा समाजाला काही तरी देण्यात यावे, या उद्देशाने हा जीआर देण्यात आला आहे. मात्र, या माध्यमातून फारसे काही हाती लागले नाही, असेही केदार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT