Eknath Shinde, Devendra fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

CM Fadnavis action: CM फडणवीसांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांना मोठा दणका; खासगी सचिवांबाबत दिले महत्त्वाचे आदेश

Shiv Sena ministers news : सीएमओ कार्यालयाकडून या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai news : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतरही महायुतीमधील मित्र पक्षात असलेले नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या काही दिवसापासून भाजप, शिंदेची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद पाहावयास मिळतात.

त्यातच गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीए यांच्या स्टाफ नियुक्तीला परवानगी दिली नाही. त्यावरून महायुतीमधील वातावरण तापले असतानाच आता घटक पक्षात नाराजी आहे. त्यातच आता सीएमओ कार्यालयाकडून या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मंत्र्याकडे नियुक्त करण्यात आलेले ओएसडी आणि पीए हे मंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी असतात. या पदांवर जवळच्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी सत्ताधारी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच ही नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही अटी घातल्या असून काही निकषही लावले आहेत. त्यामुळे या मंत्र्यांकंडील ओएसडी आणि पीए यांच्या नेमणुक रखडली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडे नवे खासगी सचिव नियुक्त कण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) मंत्री आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेनेचे संजय राठोड, उदय सामंत, शंभूराजे देसाई, भरत गोगावले, गुलाबराव पाटील या कॅबिनेट मंत्र्यांकडील खासगी सचिव नियुक्तीसाठी काही नावे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने खासगी सचिवांच्या नावाला अद्यापही हिरवा कंदील दिला नाही, यामुळे या कॅबिनेट मंत्र्यांना खासगी सचिव अद्यापही नियुक्त करण्यात आले नाहीत.

दुसरीकडे जवळपास सहा महिने झाले अनेक खासगी सचिव नियुक्ती व्हावी म्हणून त्यांच्या मूळ खात्यामध्ये रजेवर आहेत तर अन्य काही कारण देऊन सुट्टीवर गेले आहेत. मात्र, यामुळे मूळ विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील नाराज आहेत, मुख्यमंत्री कार्यालयाने ज्यांची नावे खासगी सचिव म्हणून आता नियुक्त होणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांना त्यांचे मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देखील दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काही अधिकाऱ्यांची खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली नाही तरी देखील मूळ विभागात अद्यापही कामावर रुजू झाले नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर येत्या काळात कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता देखील असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT