Ladki Bahin Yojana Beneficiaries Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana Beneficiaries : लाडकी बहीण योजनेत धक्कादायक आकडे; सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील 4 लाख सदस्य, आठ हजार सरकारी, तर 29 हजार पुरुष लाभार्थी

CAG Flags Irregularities In Maharashtra's Ladki Bahin Scheme : कॅगच्या अहवालानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न; अपात्र लाभार्थी, अतिरिक्त खर्च आणि वसुलीबाबत सरकारची भूमिका काय?

Pradeep Pendhare

Maharashtra Ladki Bahin Scheme : महायुतीला राज्याच्या सत्तेत नेणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. परंतु हीच योजना आता सत्तेतील महायुतीच्या गळ्यात अडकलेले हडूक ठरू लागली आहे. घाईघाईने राबवलेल्या या योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतर त्यातून धक्कादायक अशी माहिती समोर येऊ लागली आहे.

या योजनांच्या लाभार्थींमध्ये 4 लाख 40 हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे सदस्य आढळली आहे. तर लाभ घेतलेले थेट सरकारी कर्मचारी हे आठ हजार आहेत, असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) पडताळणीनंतर तब्बल 92 लाख लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले. याचा चुकीच्या 92 लाख लाभार्थ्यांवर या योजनेद्वारे 14 हजार कोटी रुपयांची उधळण झाली आहे. विशेष म्हणजे, या लाभात 29 हजार पुरुष लाभार्थी आहेत.

या योजनेवर कॅगनुसार योजलेल्या खर्चापेक्षा 3541 कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे समोर आले आहे. ही योजना महायुतीने (Mahayuti) जून 2024 ला जाहीर केली. लगेचच ॲागस्टमध्ये दोन हप्ते वितरीत करण्यात आले. विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महायुतीनं याच योजनेत महिना दीड हजारवरून ती रक्कम दोन हजार करण्याचे आश्वासन दिले.

लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या आणि घरात राहणाऱ्या महिलांसाठी होती. मात्र, पडताळणीदरम्यान चारचाकी वाहनधारक तसेच आयकर भरणाऱ्या काही महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले. अशा सुमारे 14 लाख अपात्र लाभार्थींना लाभ घेतल्याचे समोर आले. यातून योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याचे दिसते.

दरम्यान, कॅगने आता ताशेरे ओढल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या योजनेत 4 लाख 40 हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे सदस्य आहेत. तर प्रत्यक्ष आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. यांच्याकडून लाभाच्या पैशांची वसुली होणार का? असा प्रश्न आहे.

सरकार, सरकारमधील मंत्री आणि प्रशासनाकडून वसुलीचे संकेत दिले गेले आहेत. परंतु याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे वसुली कधी होणार? सरकार याबाबत काय भूमिका घेणार? लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न कॅगच्या अहवालानंतर उपस्थित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT