

Government Employee News : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत उत्सुकता वाढत आहे. आयोगाकडून विविध मंत्रालये, विभाग आणि कर्मचारी संघटनांकडून सूचना तसेच आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी वेतनरचनेत व्यापक बदल करण्याच्या मागण्या केंद्र सरकारकडे मांडल्या आहेत. त्यामध्ये एंट्री लेव्हल-6 मधील शिक्षकांचा सुरुवातीचा मूळ पगार 1,34,500 रुपये करण्यात यावा, हा प्रस्ताव विशेष चर्चेत आला आहे.
8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवणे ही कर्मचारी (Worker) आणि शिक्षक संघटनांची प्रमुख मागणी मानली जात आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 निश्चित करण्यात आला होता. सध्याची महागाई आणि वाढलेला राहणीमानाचा खर्च लक्षात घेता तो 2.86 ते 3 दरम्यान ठेवावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 दरम्यान निश्चित झाल्यास किमान वेतन सुमारे 41 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र, शिक्षक (Teacher) संघटनांचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईचा विचार करून किमान वेतन थेट 65 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक निश्चित करण्यात यावे.
शिक्षक संघटनांच्या मागण्या केवळ मूळ वेतनापुरत्या मर्यादित नाहीत. महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये वाढलेल्या घरभाड्याचा विचार करून हाऊस रेंट अलाउन्समध्ये भरीव वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, शिक्षकांसाठी 10-20-30 करिअर प्रोग्रेशन स्किम लागू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. तसेच, सध्या मिळणारे 3 टक्के वार्षिक वेतनवाढ वाढवून ती 5 टक्के करण्यात यावी, अशीही मागणी संघटनांनी केली आहे.
सध्या या मागण्या शिक्षक संघटनांनी केंद्र सरकारसमोर मांडल्या असून, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतरच वेतनरचना आणि भत्त्यांमध्ये कोणते बदल होतील, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, या मागण्या मान्य झाल्यास सरकारी शिक्षकांच्या वेतनरचनेत आणि निवृत्तीवेतन व्यवस्थेत मोठे बदल होऊ शकतात. मात्र, याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर अवलंबून असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.