sarkarama  ‘Cockroach Party’ Instagram account with nearly 2 crore followers was reportedly hacked, triggering reactions across social media.
महाराष्ट्र

Cockroach Party Instagram Hack : काॅक्रोच जनता पार्टीचे इन्टाग्राम हॅक, तब्बल दोन कोटी फाॅलअर्स..., संस्थापक अभिजीत दिपकेंकडून अ‍ॅक्सेस गेला

CJP Instagram Hack Abhijeet Dipke : ट्विटर बंद करण्यात आल्यानंतर तब्बल दोन कोटी फाॅलोअर्स असलेल्या कोक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.

Roshan More

CJP News : कोक्रोच जनता पार्टीचे इन्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा दावा पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. तब्बल दोन कोटी पेक्षा अधिक फाॅलोअर्स असलेले अकाऊंट हॅकच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

दीपके यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'माझा इंस्टाग्राम अकाऊंटचा एक्सेस गेला आहे. मी रिक्वर करण्याचा प्रयत्न केला मात्र होत नाही. ' दीपके यांनी काही स्क्रिनशाॅट देखील शेअर केले आहेत. कोक्रोच जनता पार्टीचे बॅकअप अकाऊंट देखील बंद केले गेले आहे.

काल कोक्रोच जनता पार्टीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. सरकारने ट्विटरला हे अकाऊंट बंद करण्याची विनंती केली होती. सुरक्षेचा मुद्दा म्हणून अकाऊंट बंद करण्यास सांगितले होते. हे अकाऊंट बंद होताच पुन्हा 'कोक्रोच इज बॅक’ नावाने दुसरे हँडल सुरु करण्यात आले होते.

दीपके यांची सर्व अकाऊंट हॅक

अभिजित दीपके यांनी ट्विट करत सांगितले की, 'माझे वैयक्तिक इंस्टाग्राम खाते हॅक झाले. ट्विटरने खाते निलंबित केले. बॅकअप खाते देखील बंद करण्यात आले.'Cockroach Janata Party' चे अधिकृत इंस्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. या खात्याचा ॲक्सेस आता आमच्यासाठी नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT