Congress  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress Alert : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा, काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले,...

NCP Merger Congress : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस सतर्क झाली असून केंद्रातून नेत्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आली आहेत.

Roshan More

Congress News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. 10 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतील. त्यानंतर आम्ही विलीकरणाबाबत एकत्र बसून चर्चा करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरणाबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे.

दिल्लीतील हायकमांडकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना सतर्क राहण्याच्या सांगित शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जास्त अवलंबून राहू नका, अशा थेट सूचना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टिने स्वबळावर पक्षाचा विस्तार करण्याचे देखील हायकमांडकडून सांगण्यात आले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वतंत्रपणे रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील मित्रांवर विसंबून न राहता आपली ताकद वाढवण्यासाठी काम सुरू करण्याच्या सूचना राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

आघाडीत बिघाडी?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विलीनीकरण झाले तर महाविकास आघाडीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महाविकास आघाडीत केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष राहतील. मुंबई महापालिकेत हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT