NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजितदादांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा; ‘होय आमच्यासमोर बोलणं झालं होतं...’

Sayaji Shinde Big claim : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू असताना अजितदादांचे निकटवर्तीय सयाजी शिंदे यांनी एकत्र येण्याबाबत आधीच चर्चा झाल्याचा दावा केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Sharad Pawar-Sayaji Shinde-Ajit Pawar
Sharad Pawar-Sayaji Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 08 February : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यावर वारंवार बोललं जात आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांच्याकडून त्याबाबत भाष्य केलं जात नाही. मात्र, आता अजितदादांचे निकटवर्तीय असलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठं भाष्य केलं आहे. ‘एकत्रितपणे सगळं सुरू होईल, असं आमच्यासमोर बोलणं झालं होतं,’ असा दावा शिंदे यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कुटुंबीयांची अभिनेते सयाजी शिंदे यांनी बारामतीत भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सयाजी शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केले.

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले, महाराष्ट्र घडविण्यात मोठ्या पवारांचा (शरद पवार) मोठा वाटा आहे. त्यांचं काम अजित पवार हे पुढे घेऊन जात होते. सर्वधर्मसमभाव ठेवून ते काम पुढे नेण्याचे ठरविले होते. अजितदादांचे स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण केलं पाहिजे. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे व इतरांनी पुढे नेले पाहिजे.

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं असं अजितदादांचं पहिलं स्वप्न होतं. ते पहिलं पूर्ण झालं पाहिजे. तसं झालं तरच महाराष्ट्राची मोठी ताकद राहील. महाराष्ट्राची ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीनं एकत्र आलं पाहिजे. त्यांच्या कौटुंबीक अथवा राजकीय भावना असतील, त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Sharad Pawar-Sayaji Shinde-Ajit Pawar
Sunil Tatkare : सुनील तटकरेंचे सूर बदलले, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले, 'एकत्र...'

सयाजी शिंदे म्हणाले, आमच्यासमोर बोलणं झालं होतं की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रितपणे सुरू होईल, सगळं. पण आता अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आता नक्की काय होणार, असा प्रश्न आहे. पण कोणी काही न उठवता, त्याला वेगळं वळण न देता दोघांनी एकत्र येऊन हे काम पुढं नेलं तर महाराष्ट्र चांगला राहील. महाराष्ट्र विकसीत होईल. महाराष्ट्राएवढं विकसीत राज्य नाही, त्याला कोणी मागं नाही खेचलं पाहिजे आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे.

Sharad Pawar-Sayaji Shinde-Ajit Pawar
Solapur ZP Election : आमदार अभिजीत पाटलांचा भाऊ अन् भाजप उमेदवार यांच्यात खडाजंगी; पंढरपूर तालुक्यात चुरशीने मतदान

जेवढा माझा अजितदादांशी संपर्क होता, तेवढा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी आलेला नव्हता. दादांशीही या निवडणुकीच्या निमित्तानेच राजकीय संपर्क आलेला होता. पूर्वी फक्त कामापुरता यायचा. राजकारण करताना बऱ्या वाईट गोष्टींकडे पॉझिटिव्ह पद्धतीने बघण्याचं अजितदादांकडून शिकायला मिळालं, असंही सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com