Mumbai Deputy Mayor : मुंबईत एकनाथ शिंदेंनी संजय घाडींसाठी आकाश-पाताळ एक केलं; आमदारपुत्राचं तिकीट कापलं, माजी आमदाराचीही नाराजी ओढावून घेतली!

Eknath Shinde Shivsena News : शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी महिला नगरसेविकेला संधी दिली जाणार असे शेवटच्या क्षणापर्यंत सांगितले जात होते. त्यासाठी माजी आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा देखील होती.
BMC Election eknath Shinde
BMC Election eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंनी संपूर्ण गेम पलटावत निष्ठावंत शिवसैनिक संजय घाडीच्या पाठीमागे पहाडासारखे उभे राहत त्याला उपमहापौर पदाची संधी दिली. शिंदे यांनी संजय घाडींसाठी आकाश-पाताळ एक केल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी महिला नगरसेविकेला संधी दिली जाणार असे शेवटच्या क्षणापर्यंत सांगितले जात होते. त्यासाठी माजी आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा देखील होती.

तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक पाचमधून घाडींना उमेदवारी देत असताना आमदारपुत्राचे तिकीटही त्यांनी कापत नाराजी ओढावून घेतली. त्यानंतर घाडींना उपमहापौर पदाची संधी देताना त्यांनी कार्यकाळही बदलत सव्वा वर्षांसाठी त्यांना संधी दिली आहे.

BMC Election eknath Shinde
BJP Mumbai Mayor : उद्धव ठाकरेंनी भाजपचा पैरा फेडला; मुंबईच्या महापौर निवडणुकीत माघार, रितू तावडेंचा बिनविरोध विजय निश्चित

शिवसेनेत जून 2022 साली उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड करीत उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. त्यावेळी शिंदेंना मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीदेखील साथ दिली होती. त्यावेळी संजय घाडींनी सुर्वेंच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाडींनी एप्रिल 2025 मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत एंट्री केली होती.

BMC Election eknath Shinde
Pune ZP Election: पुणे झेडपीत कुणाची सत्ता? मतदारांची अजितदादांना साथ, NCP नंबरचा वन पक्ष? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी समोर

महायुतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला उपमहापौरपद आले. त्यासाठी पहिल्यांदा यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव या महिला नगरसेविकांच्या नावाची चर्चा होती. यामिनी जाधव आमदार राहिल्या आहेत. त्यांचे पती स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. तर तृष्णा विश्वासराव यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या कारभाराचा प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांनी सभागृह नेतेपदही भूषवलले आहे. त्यामुळे यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव यांच्याकडे उपमहापौर जाईल, अशी शक्यता होती. पण घाडी यांनी दिग्गजांना मागू टाकून बाजी मारली.

BMC Election eknath Shinde
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवाराला संजय शिरसाट यांचा विरोध? दुसरा उमेदवार देताच शिवसेना सचिवांचे तातडीने पत्र

मुंबई महापालिकेत उपमहापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde ) संपूर्ण गेम पलटावला. त्यांनी निष्ठावंत शिवसैनिक संजय घाडीच्या पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली. त्याशिवाय घाडींना उपमहापौर पदाची संधी देताना त्यांनी कार्यकाळही बदलत सव्वा वर्षांचा केला आहे.

BMC Election eknath Shinde
Congress corporators : काँग्रेससोबत दगाबाजी केलेल्या 16 नगरसेवकांचं पद धोक्यात : भाजपला दिलेला पाठिंबा अंगलट येणार?

संजय घाडी 2017 मध्ये एकसंध शिवसेनेकडून नगरसेवक होते. त्यांनतर 2026 मध्ये प्रभाग क्रमांक पाचमधून लढण्यास उत्सुक होते. पण त्यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी देण्यात आली होती. घाडी इच्छुक असलेल्या प्रभागातून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना त्यांचे पुत्र राज सुर्वे यांच्यासाठी प्रभाग क्रमांक पाचमधून तिकीट हवे होते.

BMC Election eknath Shinde
Pune ZP Election: पुणे झेडपीत कुणाची सत्ता? मतदारांची अजितदादांना साथ, NCP नंबरचा वन पक्ष? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी समोर

आमदार पुत्राचे तिकीट कापले

जागावाटपात प्रभाग क्रमांक पाच शिवसेनेला सुटला. तर प्रभाग क्रमांक तीन भाजपकडे गेला. त्याठिकाणी भाजपने प्रकाश दरेकर यांचे तिकीट फायनल केले. तर प्रभाग 5 मधून आमदारपुत्र राज सुर्वे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे घाडी यांना प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले. मात्र घाडी यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून लढणार नाही, असा पवित्रा घेतला. प्रभाग क्रमांक 5 मधूनच तिकीट द्या, या मागणीवर घाडी ठाम राहिले.

BMC Election eknath Shinde
Zilla Parishad elections exit poll: जिल्हा परिषदेतही भाजपचाच डंका : एक्झिट पोलमध्ये नंबर वन पक्षाचा अंदाज; सविस्तर आकडे काय?

त्यानंतर हा संपूर्ण विषय एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला. अखेर घाडी यांना प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी जाहीर झाली. त्यासाठी राज सुर्वे यांचे तिकीट कापण्यात आले होते. या प्रकारानंतर आमदार प्रकाश सुर्वे काही दिवस नॉट रिचेबल होते. काही दिवसानंतर ते प्रचारात सहभागी झाले होते. या सर्व घटनानंतर संजय घाडी प्रभाग क्रमांक 5 मधून लढले आणि विजयी झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवार आणि माजी नगरसेविका सुजाता पाटेकर यांचा पराभव केला.

BMC Election eknath Shinde
Pune ZP Election: पुणे झेडपीत कुणाची सत्ता? मतदारांची अजितदादांना साथ, NCP नंबरचा वन पक्ष? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com