Congress News Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : लोकसभेनंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला, विधानसभेसाठी 'मास्टरप्लॅन' तयार; मुंबईत मॅरेथॉन बैठक

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुती सरकारला शह देण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची जागावाटपासंबधी गुरुवारी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी उपस्थित राहणार असून यामध्ये राज्यातील जागावाटपावर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस (Congress) लागली आहे. काँग्रेस किती जागा लढणार हे अजून ठरले नसले तरी मास्टरप्लॅन तयार करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. परिणामी महाविकास आघाडीत (MVA) काँग्रेसने पुढचे पाऊल टाकले आहे. या बैठकीत काँग्रेस लढणार असलेल्या जागांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीतील चर्चेनंतर त्या इच्छुक उमेदवाराला निरोप पाठवून तयारी करण्याचा मेसेज दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबईत होत असलेल्या या बैठकीतील चर्चेकडे इच्छुकांचे कान लागले आहेत. या बैठकीचा अजेंडा बाहेर येण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, या बैठकीनंतर मोजक्या नेत्यांना कामाला लागा, असे आदेश काँग्रेसकडून दिले जाणार आहेत.

त्यामुळे कॉँग्रेसच्या इच्छुक नेतेमंडळीचे लक्ष या बैठकीकडे असणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेले काही जण पुढील मेसेज आल्यानंतर कामाला सुरुवात करण्याची शक्यता आहे. ही बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून छुप्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपासंबधीची चर्चा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची चर्चा होणार आहे. काँग्रेस बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत जागांची मागणी केली जाणार आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने गेल्या काही दिवसापासून विविध कल्याणकारी योजनेच्या घोषणांचा धडका लावत महायुतीने सध्या आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT