Kailas Gorantyal Join BJP sarkarnama
महाराष्ट्र

Kailas Gorantyal Join BJP : '50 खोके एकदम ओके' घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल भाजपमध्ये, पहिलं टार्गेट जाहीरपणे सांगितलं

50 khoke ekdam ok Kailas Gorantyal BJP : माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपचे 'कमळ' हाती घेतले आहे. त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Roshan More

Kailas Gorantyal News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना उद्देशून '50 खोके एकदम ओके' ही पहिली घोषणा तत्कालीन जालनाचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली होती. ही घोषणा फारच प्रसिद्ध झाली होती. या घोषणतून आजही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या डिवचले जाते. मात्र, ज्यांनी ही घोषणा सर्वप्रथम दिली होती. त्याच कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा 'हात' सोडत भाजपचे 'कमळ' हाती घेतले आहे.

गुरुवारी (ता.31) कैलास गोरंट्याल यांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले होते पण मुहूर्त लागत नव्हता मात्र तो आज लागला, असे गोरंट्याल यांनी सांगितले.

पक्षप्रवेशावेळी त्यांनी आपले पुढील टार्गेट स्पष्ट करताना म्हटले की, 'मी कोणत्याही अटी न ठेवता भाजपमध्ये आलो आहे. आता आमचे टार्गेट हे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. या निवडणुकांच्या कामाला लागणार असून जालना महापालिकेत पहिला महापौर भाजपचा करणार आहे.'

अर्जुन खोतकरांना घेरले

जालनाच्या आमदारना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत. कैलास गोरंट्याल हे त्यांचे प्रमुख विरोधक मानले जातात. खोतकर यांनी विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांना पराभूत केले होते. मात्र, आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने खोतकर यांची अडचण झाली आहे. खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर टीका करताना काँग्रेस सोडणारे गोरंट्याल हेच खरे गद्दार असल्याचे म्हटले आहे.

जालन्यात काँग्रेसला भगदाड

कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने जालन्यात काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. गोरंट्याल यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल, क्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, शिक्षादेवी ढक्का, जगदीश भारतीया, विजय चौधरी, विनोद रत्नपारखे, संगीता पाजगे, आनंद वाघमारे, ग्रामीणचे सरपंच गोविंद पवार, सुनील चिरखे, सरपंच मनोहर सूळसुळे, अंबादास लोंढे, तालुका उपाध्यक्ष संतोष देव्हडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मोरे, बाळूकाका सिरसाट, किशोर कावले, पंचायत समिती माजी सदस्य समाधान शेजुळ आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT