Maharashtra Politics : खातं बदललं तरी सुट्टी नाय! कोकाटेंचा व्हिडिओ दाखवणाऱ्या पवारांचे ओपन चॅलेंज, म्हणाले, सुटलो असा गैरसमज...

Rohit Pawar on Manikrao Kokate: रोहित पवार म्हणाले, कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. मात्र, त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यात बदल करत त्यांच्यावर क्रिडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकाटे हे विधीमंडळात पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ सर्वप्रथम आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता. कोकाटेंच्या राजीनाम्याविषयी ते आग्रही होते. आता खाते बदल झाला असला तरी त्यांनी सरकारला ओपन चॅलेंजच दिले आहे.

रोहित पवार म्हणाले, 'कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही.' तसेच सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीविषयी पवार म्हणाले आहेत की, कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटेसाहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती.

Manikrao Kokate Ajit Pawar
Jayant Patil : 'मी आता मोकळाच, बसून करेक्ट कार्यक्रम लावीन', पक्ष सोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जयंत पाटलांचा निर्वाणीचा इशारा

'सरकारने कोकाटेसाहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा.

अजितदादांचा 'मास्टर स्ट्रोक'

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यामुळे वर्षभरात जर माणिकराव कोकाटेंनाही राजीनामा द्यावा लागला असता तर सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही बॅकफूटवर केला असता. त्याचा विचार करूनच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे खाते बदलाची विनंती करत कोकाटेंचे खाते बदलून दत्तात्रय भरणेंना कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली.

Manikrao Kokate Ajit Pawar
Jayant Patil : माणिकराव कोकाटेंचे खाते बदलले, जयंत पाटलांकडून थेट देवेंद्र फडणवीस टार्गेट, म्हणाले, 'लोकांना आक्षेपार्ह...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com