BJP Congress Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election Maharashtra: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; 5 नगरसेवक भाजपमध्ये

Congress Setback IN MLC Election Maharashtra News: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यातील पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करत परिणय फुके यांना बळ दिले.

Mangesh Mahale

Congress Faces Setback Before MLC Polls: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. महायुतीने भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करून निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट केले असताना काँग्रेससमोर मात्र नवे राजकीय आव्हान उभे ठाकल्याचे दिसत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला धक्का देणारी घडामोड घडली आहे.

नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखांदूर नगर पंचायतीचे 5 नगर सेवक यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. १) मुकेशजी सहजवानी, २) निशाताई बगमारे, ३) लोपाताई शिलार, ४) लताताई कुडेगावे ५) प्रमोदभाऊ कुडेगावे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला बळ दिले.

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्याची धावपळ काँग्रेसमध्ये सुरू असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ आली असतानाही पक्षाला अधिकृत उमेदवार निश्चित करता आलेला नाही. संभाव्य उमेदवारांना संपर्क साधून निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अनेकांनी यासाठी अनुकूलता दर्शवली नसल्याचे सांगितले जाते.

याचवेळी पक्षांतर्गत समीकरणांनाही वेग आला आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे निरीक्षकाची जबाबदारी सोपविल्यानंतर सुनील केदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. निरीक्षकांसोबत झालेल्या बैठकीत केदार अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे उमेदवार निवडीची जबाबदारी आता पूर्णपणे निरीक्षकांवरच येऊन पडल्याचे मानले जात आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात संख्याबळ भाजपच्या बाजूने असल्याचे चित्र असतानाही काँग्रेसने थेट लढाईचा निर्णय घेतला आहे. नाना पटोले यांनी भाजपवर टीका करत, बॅलेट पेपरवरील निवडणुकीत काँग्रेसची ताकद दिसून येईल, असा दावा केला आहे.

प्रतिष्ठेची लढाई

गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नाना पटोले यावेळी काँग्रेससाठी तशीच रणनीती आखणार का, याकडे संपूर्ण विदर्भातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित न राहता प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT