Nashik MLC Election: अखेर नाशिक शिवसेनेकडे; नरेंद्र दराडे-अनिल कदम यांच्यात लढत; भाजपचे गणेश गीते बंडखोरी करणार?

MLC Election Nashik News: नाशिक मतदार संघात शिवसेनेच्या नरेंद्र दराडे आणि अनिल कदम या माजी आमदारांमध्ये लढत होईल. एकनाथ शिंदे पक्षात तीन ते चार इच्छुक होते. मात्र पक्षाने उमेदवारी देताना धोका न पत्करता इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य दिले
MLC Election Nashik News
MLC Election Nashik News
Published on
Updated on

Mahayuti News: विधान परिषदेच्या जागावाटपात अपेक्षेप्रमाणे जळगाव भाजपला तर नाशिक शिवसेनेला सोडण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान जागा ज्या पक्षाकडे होत्या त्याला प्राधान्य देण्यात आले. रात्री उशिरा महायुतीचे जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा झाली.

नाशिक मतदार संघ महायुतीने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सोडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली. मतदारांची संख्या विचारात घेता महायुतीला ही निवडणूक सोपी ठरणार आहे.

महाविकास आघाडीने जागा वाटपाचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. जळगाव आणि नाशिक या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत. नाशिकला माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक मतदार संघात शिवसेनेच्या नरेंद्र दराडे आणि अनिल कदम या माजी आमदारांमध्ये लढत होईल. एकनाथ शिंदे पक्षात तीन ते चार इच्छुक होते. मात्र पक्षाने उमेदवारी देताना धोका न पत्करता इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य दिले.

MLC Election Nashik News
Sambhajinagar-Jalna MLC Election: सुहास शिरसाट यांची भाजप पक्षश्रेष्ठींकडून दखल; विधान परिषदेची उमेदवार जाहीर

नाशिक आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने दावा केला होता. जळगावची जागा भाजपकडेच होती. नाशिकमध्ये भाजपची मतदार संख्या सर्वाधिक आहे. हा निकष विचारात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

MLC Election Nashik News
Madhya Pradesh News: भाजप भाकरी फिरवणार! 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू, मोहन यादव मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री?

मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याचा दावा करणाऱ्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. पक्षाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा त्यांचा दावा होता. मात्र उमेदवारी बाबत खूप आधीपासूनच तयारीला लागलेल्या गीते यांची निराशा झाली आहे. आता ते काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com