Harshwardhan Sapkal On thackeray brothers rally mumbai And MNS-ShivSena UBT Alliance sarkarnama
महाराष्ट्र

Congress : ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यानंतर काँग्रेसचं मोठं वक्तव्य; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचे युतीचे संकेत?

Harshwardhan Sapkal On MNS-ShivSena UBT Alliance : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी (ता.5) मुंबईत विजयी मेळावा घेण्यात आला.

Aslam Shanedivan

Mumbai News : हिंदी सक्तीसह त्रिभाषा सूत्राबाबत लादलेल्या निर्णय राज्य सरकारने मराठी माणसाच्या दबावानंतर मागे घेतला. याबाबतचे दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शनिवारी (ता.5) मुंबईत वियजी मेळावा झाला. या वियजी मेळाव्यानंतर ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यावर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या एकत्र येण्याचे हादरे दिल्लीत बसल्याचे बोलले जात असतानाच आता काँग्रेसने ठाकरे बंधुंच्या युतीसह मेळाव्यावर भाष्य केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. (Congress Pradeshadhyaksha Harshvardhan Sapkale's reaction to Raj Thackeray and Uddhav Thackeray's reunion at the Mumbai victory rally)

ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला ठाकरे परिवारासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतरच राज-उद्धव युती होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तसेच याआधीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील युतीबाबत वक्तव्य केल्यानंतर आता नवी समिकरण समोर येताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून सपकाळ यांनी यावर विधान केलं आहे.

सपकाळ यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पहिल्यापासूनच एकत्र होती. पण सपकाळ यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत युती केली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि देश पातळीवर इंडिया आघाडी निर्माण झाली. पण लोकसभेच्या आधीच शिवसेना फुटली आणि दोन पक्ष निर्माण झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह आम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढलो.

पण आगामी स्थानिकच्याबाबत राज्यात असलेल्या महाविकास आगाडीत अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. कोणतीही आघाडी किंवा युती केलेली नाही, असे स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिले आहे. तर युती, आघाडी कोणाबरोबर करायची याचे सर्व अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. स्थानिक नेतृत्वाला समविचारी पक्षासोबत युती करण्याचे अधिकार दिले आहेत, असेही सपकाळ यांनी म्हटलं आहे. सध्यातरी राज्यात काँग्रेससाठी समविचारी पक्षांत उद्धव ठाकरे आहेत. पण काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल. इतरांच्याबाबत व्यापक स्वरुपाचा निर्णय घेतला जाईल, असेही सपकाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सपकाळ यांनी ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठीच्या मुद्द्यावर दोघांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा जल्लोष आहे. सध्या युतीबाबात दोन्ही पक्षांकडून कोणतेही वक्तव्य आलेलं नाही. आगामी काळात तसे स्पष्टीकरण आल्यावर त्यावर चर्चा करता येईल. स्थानिकबाबत सर्व अधिकार स्थानिक काँग्रेस कमिटीला देण्यात आले असून त्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या कधी होतात हेच माहित नाही. यात कोणता गौडबंगाल आहे हेच कळत नसल्याचा टोला सपकाळ यांनी लगावला आहे. तर भाजपचा मूळ हेतू हाच लोकांचे लक्ष विचलिच करण्याचा असल्याचाही दावा सपकाळ यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT