Vijay Wadettiwar And Udayanraje sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar On Udayanraje : संतप्त उदयनराजेंची 'ती' मागणी अन् काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी फडणवीस सरकारला डिवचलं

Aurangzeb's Tomb : सपा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे म्हणत गौरव केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर आझमी यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. पण आता वाद काही थांबलेला नाही.

Aslam Shanedivan

Mumbai News : सपा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा गौरव करणारे वक्तव्य केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील जनता यावरून रोष व्यक्त करत आहे. तर अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. ज्यानंतर त्यांचे अधिवेशन कालावधीत निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर प्रतिक्रिया देताना औरंगजेबाची ही कबरच उखडून टाका असे म्हटलं होते. त्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे असे म्हणत असतील तर सरकारने तसा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून राज्यात सतत कोणता ना कोणता वाद होतोच असतो. आताही सपा आमदार अबू आझमी यांच्यामुळे तो समोर आला आहे. याचपार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी, औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि आपल्या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या या औरंगजेबाने केली. पण या औरंगजेबाची कबरी येथे आहे. सध्या याचे उदात्तीकरण, दैवतीकरण केलं जातयं. तेथे उरूस भरवले जातायतं. जे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे असले प्रकार थांबण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे. बस एक जेसीबीच यासाठी काफी आहे, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले होते.

याच मागणीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला डिवचले आहे. वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना उदयनराजेंची अशी मागणी असेल तर सरकारने तसा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी, औरंगजेब कोण होता? कसा होता? हे सगळ्यांना माहित आहे. ज्याने, स्वतःच्या बाप, भावाला सोडलं नाही ती प्रवृत्ती औरंगजेबची होती. त्याने सत्तेसाठी कुठलीही दयामाया दाखवली नाही. अशा क्रूर व्यक्तीच्या नावाला कोणी समर्थन देणार नाही.

मात्र आता खासदार उदयनराजे यांनी कबरीबाबत जी मागणी केली आहे. त्याचा निर्णय सरकारचा आहे पुरातत्त्व विभागाकडे आहे. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घ्यावा, ऐवढीच आपली भूमिका असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. औरंगजेबाच्या नावाखाली धर्मांधता पसरवणे, हिंदू-मुस्लिम वाद पसरवणे योग्य नाही. बहुतांश मुस्लिम हे शिवाजी महाराजांसोबत होते. औरंगजेब ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये. औरंगजेब धर्मवेडाच होता, त्याचा काळा इतिहासच आहे. अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात आहे. या संदर्भात उदयनराजेंनी म्हटलं असेल तर सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा, असेही मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

लाडकी बहीण

राज्यातील महायुती सरकारने 27 लाख लाडक्या बहिणींना बाद केलं आहे. आमच्या आदिती ताई तटकरे म्हणतात आम्ही जाहीरनाम्यात दिलं ते लगेच काय लागू करण्यासाठी नाही, म्हणजे शेवटचे तीन महिने असताना लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहात का? सध्या राज्याची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. आर्थिक स्थिती वाईट आहे. मागच्या बजेट मधील 40% खर्च झाला असून अशा परिस्थितीत लाडक्या बहिणीच्या नावाखाली फसवणूक होत असेल तर लाडक्या भावाला बहिणी माफ करणार नाही. तर ही योजनानंतर बंद होण्याची शक्यता आहे. पण ती आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि बंद झालीच तर आम्ही रस्त्यावर उतरू असाही इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा विरूद्ध ओबीसी

सध्या मराठा विरूद्ध ओबीसी असं बीडचं राजकारण झाल असून शाळांमधून मुलांना काढण्याचे काम सुरू झालं आहे. मराठवाड्यात मराठ्यांची शाळा असली तर ओबीसींचे मुले नाव काढत आहेत. ओबीसींच्या असेल तर मराठा मुले नाव काढत आहेत, हे जे चाललंय ते भयानक चाललेलं आहे. राजकीय वाद सामाजिक स्तरावर गेलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचे देणं घेणं राहिलेलं नाही. आपल्या माणसाला मदत करा, महाराष्ट्रातील बीड किंवा दोन-तीन जिल्ह्यात आता इतका टोकाचं वातावरण दोन्ही समाजाने उचललेला आहे.

सरकारचं लक्ष दिसत नाही, हा उद्रेक महाराष्ट्राच्या हिताचा नाही आणि पुरोगामी विचाराच्या दृष्टीने उद्या अत्यंत भयानक होण्याची शक्यता असून सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तर बीडमध्ये मोठा उद्रेक होऊन होण्याची परिस्थिती आहे. पण पोलीस किंवा होम डिपार्टमेंटचा काय रिपोर्ट आहे, ते माहीत नाही. मात्र ज्यावेळेस एखादी मोठी घटना होईल. त्यावेळी हजारो लोकांना आपला जीव गमावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT