Vijay Wadettiwar : महायुतीवर तुटून पडणाऱ्या वडेट्टीवारांच्यांच अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाची नोटीस

Political Controversy News : वडेट्टीवार यांना या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काँग्रेसचे नेते व विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांना या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ब्रम्हपुरीचे काँग्रेस (Congress) आमदार विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी याचिका दाखल केली आहे. वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

Vijay Wadettiwar
Eknath Shinde : फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा जोरदार धक्का; 'या' महत्त्वाच्या पदावरुन जवळच्या नेत्याला हटवले

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेतील महत्वपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे

Vijay Wadettiwar
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भर सभागृहात इशारा, म्हणाले 'कोणीही असो...'; सदस्यांचे टाळ्या वाजवून प्रोत्साहन

काँग्रेसचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar ) यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. याच मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून नारायण जांभुळे उमेदवार होते. निव़़डणुकीच्या दरम्यानही जांभुळे यांनी वडेट्टीवार यांच्या शपथपत्रावर आक्षेप नोंदविला होता.

Vijay Wadettiwar
Opposition leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी आंध्र प्रदेशाप्रमाणेच राज्यातील परिस्थिती; चार दशकापूर्वीचा इतिहास काय सांगतो?

वडेट्टीवार यांनी ज्या मुद्रांकावर शपथपत्र सादर केले, तो त्यांच्या पत्नीने स्वतःच्या नावावर खरेदी केला आहे. वडेट्टीवार त्यावर शपथपत्र सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मुद्रांक कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे. हा मुद्रांक पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला आहे. मात्र, त्याचा उपयोग शपथपत्रासाठी करण्यात आला. त्यामुळे वडेट्टीवार यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी विनंती या याचिकेद्वारे केली होती.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar : बीडचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवणार? अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

निवडणूक संपल्यावर याचिका दाखल करण्याचा दिला होता सल्ला

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दाखल याचिकेनंतर याचिकाकर्त्याला न्यायालयाने फटकारले होते. संविधानातील कलम 329 नुसार न्यायालय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला निवडणूक संपल्यावर याचिका दाखल करण्याचा सल्ला देत ही याचिका फेटाळली होती. याचिकाकर्त्याने निवडणूक संपल्यावर आता याप्रकरणात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

Vijay Wadettiwar
BJP Politics : माजी मुख्यमंत्र्यांनी सत्ता सोडून भाजपमध्ये प्रवेश केला; आता तेल गेले, तूप गेले...

पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

या प्रकरणावरील सुनावणीनंतर वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता येत्या काळात होत असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Vijay Wadettiwar
Raju Shetty : 500 कोटींचा घोटाळा झालाच नाही, 'त्या' नेत्याच्या आरोपावर अप्पर पोलिस महासंचालकाचे स्पष्टीकरण; 'सीएम'कडे साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com