Vijay Wadettiwar PM Narendra Modi on Caste-wise census sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : जातीनिहाय जनगणनेचे स्वागत! परंतू... वडेट्टीवारांच्या मनात शंका

Vijay Wadettiwar On Caste-wise census : जातीनिहाय जनगणनेनंतर ज्यांची जितकी संख्या तितकी भागिदारी ही काँग्रेसचे भूमिका आहे. मात्र ही घोषणा फक्त घोषणा ठरू नये, अशी शंका काँग्रेसने व्यक्त केलीय.

Rajesh Charpe

Nagpur News : काँग्रेसचे नेते राहूल गांधी सातत्याने देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करीत होते. ओबीसी संघटनाही जनगणना करावी, यासाठी साततत्याने सरकारचे दार ठोठावत होते. भाजपचा यास विरोध आहे असा आरोपही केला जात होता. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. या घोषणाचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वागत करतानाच एक शंकाही व्यक्त केली.

वडेट्टीवार म्हणाले, देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. आमचे नेते राहूल गांधी यांनी सातत्याने हीच मागणी लावून धरली होती. त्याबाबत ते बोलत ही होते. पण जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध होता. अखेर केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

जातीनिहाय जनगणनेनंतर ज्यांची जितकी संख्या तितकी भागिदारी ही काँग्रेसचे भूमिका आहे. मात्र ही घोषणा फक्त घोषणा ठरू नये, उद्या बिहार राज्याची निवडणूक आहे. ती डोळ्यासमोर ठेवून राजकीय खेळी भाजपने करू नये. ओबीसी समाज त्यांच्या हक्कापासून वंचित होता. जातीनिहाय जनगणना झाल्यावर ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे हक्क मिळू शकेल अशी आशाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशे जागा हवा असल्याचा आरोप केला होता. यासोबतच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी रेटून धरली होती. याचा चांगलाच फायदा काँग्रेस महाविकास आघाडीला झाला होता.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि राष्ट्रीय समन्वयक तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. चंद्रपूरमध्ये जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतात 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती. 20111 साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती.

मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. भाजप सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. या निर्णयाचा ओबीसींसह इतर सर्वच प्रवर्गातील जातींना फायदा होणार आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकार व हक्कांचे खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीपर्यंत लाभ पोहोचतील, अशी प्रतिक्रिया डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT