Sajid Khan Pathan threat Sarkarnama
महाराष्ट्र

Congress MLA Threat : काँग्रेस आमदार बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर, धमकीचा फोन; सभागृहात सांगितली शेवटची इच्छा, म्हणाले 'मंदिरासाठी...'

Bishnoi gang threat to Congress leader: काँग्रेस आमदार साजेद पठाण यांना बिश्ननोई गँगने खंडणीसाठी धमकी दिली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याविषयी त्यांनी सांगत आपल्या काही झाले तर शेवटची इच्छा सभागृहात सांगितली.

Roshan More

Sajid Pathan News : पावसाळी अधिवेशन सुरू असताना काँग्रेसचे अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये धमकीच्या फोनची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवली गेली आहे, ज्यामध्ये समोरची व्यक्ती म्हणते: "पैसे की व्यवस्था कर ले वरना मौत के लिए तैयार हूँ... ऐसा करेंगे ना कि पूरे अकोला को पता चल जाएगा।", असे धमकावत आहे.

आमदार साजिद पठाण यांनी विधानसभेत उपस्थित करत म्हटले आहे की, "परवाच मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही बिश्नोई गँग संपवू, पण काल रात्री ८:३० वाजता मला पुन्हा धमकी आली. मी अशा धमक्यांना घाबरत नाही, जर घाबरलो असतो तर काल घरातूनच निघालो नसतो. मी थेट सभागृहात आलोय आणि अध्यक्ष महोदयांशी बोलतोय."

शेवटची इच्छा...

आमदार म्हणाले, "याच लोकांनी यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मर्डर केला होता. उद्या जर खुदा ना खास्ता माझाही मर्डर झाला, तर माझ्या मरण्यापूर्वी माझी एकच इच्छा आहे; मी अकोला शहरासाठी, तिथल्या भव्य राजेश्वर मंदिरासाठी जी निधी मागितली होती, ते भव्य मंदिर तुम्ही बनवून द्यावे."

अध्यक्षांनी घेतली दखल...

काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत आमदार पठाण यांना पूर्ण सुरक्षा देण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले की, आमदारांना सुरक्षा पुरवण्याबाबत आणि त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याचा संपूर्ण विचार करून शासन योग्य ती सुरक्षा देण्याबाबत निश्चितच पावले उचलेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT