Siya Goyal Viral Video: केतनचा जीव घेतल्यानंतरही सियाची मुजोरी कायम? पोलीस कोठडीतून बाहेर येताच केले अश्लील हावभाव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचा पोलीस कोठडीत असताना प्रसारमाध्यमांसमोर अश्लील हावभाव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
Accused Siya Goyal
Accused Siya Goyal Sarkarnama
Published on
Updated on
  1. केतन अग्रवाल प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलचा पोलिसांसोबत असतानाचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल झाला आहे.

  2. तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला गंगाधाम चौकातील तिच्या घरी नेऊन पंचनामा केला.

  3. घराबाहेर पडताना मीडियाच्या कॅमेरांकडे पाहत सियाने अश्लील हावभाव केल्याचा आरोप होत आहे.

  4. व्हायरल VIDEO नंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून सियाच्या वागणुकीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Pune Police News: लोहगड परिसरातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपत आल्याने गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्याआधी तपासाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयलला विविध ठिकाणी नेऊन चौकशी आणि पडताळणी केली.

तपासादरम्यान पोलिसांनी सियाला गंगाधाम चौकातील तिच्या राहत्या घरी नेले. तेथे तिचे कपडे, मोबाईल आणि इतर साहित्याची तपासणी करून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणाशी संबंधित कोणतेही पुरावे नष्ट करण्यात आले आहेत का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Accused Siya Goyal
Mumbai Manhole Death: मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? मॅनहोलने आतापर्यंत किती मुंबईकरांचा जीव घेतला?

दरम्यान, तपास पूर्ण करून पोलिसांनी सियाला घराबाहेर आणताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलिसांच्या वाहनाकडे जात असताना सियाने कॅमेरांकडे पाहत आक्षेपार्ह हावभाव केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये सियाने मधले बोट दाखवत आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये अशी कृती अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद मानली जाते. गंभीर गुन्ह्याच्या आरोपांनंतरही तिची वागणूक बदललेली नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

महिला पोलीस कर्मचारी तिला वाहनापर्यंत घेऊन जात असतानाच तिने हे हावभाव केल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या घटनेनंतर प्रकरणाची चर्चा आणखी तीव्र झाली असून नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com