Ameet Satam BJP Controversy : मुंबईतील दोन मृत्यूनंतर भाजप अध्यक्षांची असंवेदनशीलता; अमित साटम यांना हसूच आवरेना, संदर्भ वेगळा असल्याचं स्पष्टीकरण

Ameet Satam controversy after Mumbai deaths: मुंबईतील सलग घडलेल्या दुर्दैवी घटनांवर संताप असतानाच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा विधिमंडळ परिसरातील एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे.
Ameet Satam clarification on viral reaction
Ameet Satam clarification on viral reactionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Open Manhole Death : मुंबईतील सलग घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा विधिमंडळ परिसरातील एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ते गंभीर दुर्घटनांचा संदर्भ देताना हसताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला असून, त्यावरून भाजपवर असंवेदनशीलतेचे आरोप होत आहेत.

मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसामुळे आधी चेंबूर येथे विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आज सकाळी साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने मुंबईकरांमध्ये संताप वाढला आहे. मृत व्यक्तीची ओळख अस्लम इसाक शेख अशी झाली आहे.

याचदरम्यान, पुण्यातील (Pune) लोणी काळभोर येथे सांडपाण्याच्या डबक्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. राज्यभर अशा दुर्घटनांचे सत्र सुरू असताना महाराष्ट्रातील नागरिक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.

Ameet Satam clarification on viral reaction
Uddhav Thackeray : इतिहासाची पुनरावृत्ती? बाळासाहेबांना काँग्रेसची साथ महागात पडली, आता उद्धव ठाकरेंचीही तीच अवस्था?

मात्र या घटनांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात अमित साटम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. जंयत पाटील यांच्याशी बोलताना साटम म्हणाले, “काल झाडांवर होतं, आज मॅनहोलवर आलं…” आणि त्यानंतर ते हसल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

Ameet Satam clarification on viral reaction
Uddhav Thackeray Attack : ‘पळालाय… सापडला तर सोडू नका’; उद्धव ठाकरेंच्या फर्मानानं 'खाऊ'साहेब वाकचौरेंचं वाढलं टेन्शन

हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला. मुंबईतील दोन भीषण दुर्घटनांमध्ये नागरिकांचे जीव जात असताना सत्ताधारी पक्षाचे नेते अशा गंभीर विषयांवर हलक्याफुलक्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साटम यांनी सावरली स्वत:ची बाजू

वाद वाढताच अमित साटम यांनी स्वतः स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले की, “या दोन्ही घटना सर्वप्रथम मीच सभागृहात मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही मीच केली. माझ्या मागणीनंतर काल तीन ते चार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. दोन वेगळ्या घटनांना चुकीच्या पद्धतीने जोडून वेगळा अर्थ काढू नये.”

बानवकुळे धावले साटम यांच्या मदतीला

दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही साटम यांची बाजू घेतली. त्यांनी म्हटले, “अमित साटम हे प्रगल्भ नेते आहेत. अशा संवेदनशील विषयावर ते जाणीवपूर्वक असंवेदनशील वागतील, असे मला वाटत नाही. सरकार या घटनांबाबत पूर्ण संवेदनशील आहे.”

भाजपची अडचण वाढवणार मुद्दा विरोधक सोडेना

मात्र विरोधकांनी हा मुद्दा सोडण्यास नकार दिला आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेची हमी देणारे नेतेच नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांवर हसताना दिसत असल्याचा आरोप करत विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com