MLC Election Congress Strategy Failed Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Congress : उमेदवारांनीच केला काँग्रेसचा घात,मोठी नामुष्की; पक्षांतर्गत रणनीती फसली!

MLC Election Congress Strategy Failed: सहा ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अवघ्या तीन ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे काँग्रेसची रणनीती फसल्याची चर्चा आहे.

Roshan More

Congress News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसवर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. तब्बल 9 जागा लढणाऱ्या काँग्रेसचा त्यांच्याच उमेदवारांनी घात केला. 9 पैकी सहा जागांवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यातील एक जण हा काँग्रेसचा नेता अपक्ष म्हणून रिंगणात होता. आता फक्त तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढत आहेत.

सोलापूरमध्ये ज्यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही बनावट असल्याचे समोर आल्याने त्यांचा अर्ज बाद झाल्याचे सांगितले जात आहे. तर, अहिल्यानगरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे होते. त्यांनी तेथून माघार घेतल्यानंतर काँग्रेस नेते करण ससाणे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. मात्र, त्यांनी देखील शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

नांदेडमध्ये संख्याबळ असताना देखील काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली. रामदास पाटील सुखटणकर यांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, यवतमाळमधील उमेदवार साहेबराव कांबळे यांनी पुरेसे संख्याबळ नसल्याचे कारण देत माघार घेतली. तर, भांडारा गोंदीयामधील उमेदवार दिलीप बनसोडे यांनी माघार घेतली.

मैदानातील तीन उमेदवार

सहा ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अवघ्या तीन ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामध्ये नागपूरमधील अतूल लोंढे लढत आहेत. तर, अमरावतीमधून हर्षदीप देशमुख आणि धाराशिवकर लातूरमधून महेश देशमुख हे उमेदवार आहेत.

काँग्रेसची रणनीती फसली

महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. तरी देखील त्यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस, महाविकास आघाडी ही संख्याबळ नसताना देखील विरोधामध्ये उभी राहिली, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मात्र, उमेदवारांच्या माघारीमुळे काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून त्यांची रणनीती फसल्याची चर्चा आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, कुठे घातपातने, कुठे विश्वासघाताने तर कुठे पैसा फेक तमाशा देख या अनुषंगाने ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागे महायुती लागली आहे. महायुतीच्या अंतर्गतजी धुसफूस आहे तिचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे विरोधात कोणीच ठेवायचे नाही, अशी एकंदरीत व्यूहरचना सत्ताधारी विशेष करून भाजपने केल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT