Nashik MLC Election : गोकुळ गितेंनी शड्डू ठोकल्यानं नाशिक विधानपरिषदेचं गणित बदललं; निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मविआचे महत्व वाढले

Nashik MLC Election, Gokul Gite : पुरेसे संख्याबळ नसल्याच्या कारणाने नाशिक विधानपरिषदेच्या रणधुमाळीतून माघार घेतलेल्या मविआचे महत्व आता होणाऱ्या तिरंगी लढतीमुळे वाढले आहे.
Uddhav Thackeray- Sanjay Raut
Uddhav Thackeray- Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते व प्रसाद हिरे दोघांनी माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवल्याने तिरंगी लढत होणार आहे. बंडखोरांनी आपली बंडखोरी कायम ठेवल्याने नाशिक विधानपरिषदेची गणित बदलले आहे.

गोकुळ गिते यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. याशिवाय दुसरे अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे हे देखील भाजपचे असल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांची चिंता वाढली आहे. वरवर सोपी वाटणारी निवडणूक त्यांच्यासाठी आता अवघड झाली आहे.

त्यामुळे आता महायुतीच्या मतदारांसह महाविकास आघाडी व अपक्षांचे महत्त्व वाढले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला गेली होती. पक्षाने माजी आमदार अनिल कदम यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, कदम यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. माजी आमदार वसंत गिते यांनीही अर्ज घेतला होता, त्यांनीही भरला नाही. ठाकरे गटाने पुरेसे संख्याबळ नसल्याने व कथित घोडेबाजार होणार असल्याचे सांगत या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
MLC Election : "ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार नाही", गोकुळ गितेंनी उमेदवारी कायम ठेवली... नाशिकमध्ये दराडे विरुद्ध गिते सामना रंगणार

सुरुवातीला महायुतीतील भाजप १८८, शिवसेना १७१ व राष्ट्रवादी काँग्रेसकडे १०७ मतदान असल्याने शिवसेनेचे नरेंद्र दराडे सहज निवडून येईल असे चित्र होते. परंतु भाजपचे गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने आता मविआचे महत्व वाढले आहे. मविआचे तीन्ही पक्ष मिळून जवळपास शंभरच्या आसपास मतदान आहे. मविआने कोणाला मतदान करावे याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. परंतु तिरंगी लढतीमुळे मविआच्या नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
MLC Election : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे बंडही शमले; गोकुळ गिते मात्र अडून बसले, हॉटेलात झालेल्या त्या बैठकीत काय ठरलं?

मविआसह मालेगाव महापालिकेतील इस्लाम पार्टी व एमआयएमच्या नगरसेवकांचे देखील महत्त्व आता वाढले आहे. मविआ व मालेगावमधील नगरसेवकांचा कौल आता निर्णायक ठरणार आहे. सुरुवातीला निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पश्चातापाची भावना निर्माण झालेल्या मविआच्या तिरंगी लढत लागल्याचे पाहाता आता काहीशी सकारत्मकता निर्माण झाली आहे. याशिवाय महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे १०७ मतदान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक किंगमेकर ठरणार आहेत. राष्ट्रवादीचे गोरख बोडके व विष्णुपंत म्हैसधुणे दोघांनी निवडणुकीतून माघार घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com