Nashik MLC : मतांसाठी ईर्षेची लढाई, राजकारण बापापर्यंत पोहोचलं; थेट फडणवीसांपर्यंत राजकीय धग, नाशिक निवडणुकीत नवा ट्विस्ट

Narendra Darade Vs Ganesh Gite : महायुतीत नाशिक आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. पक्षावर चांगली पकड असलेल्या महाजन यांना विरोधी पक्षांकडून मात्र आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचे पडसाद नाशिकच्या निवडणुकीत उमटले.
Devendra Fadnavis role in Nashik MLC poll
Devendra Fadnavis role in Nashik MLC pollSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 05 Jun : नाशिक विधानपरिषदेची निवडणूक रंगणार की तडजोडीने थांबणार? हा उत्सुकतेचा विषय आहे. यानिमित्ताने भाजपच्या इच्छुकांनी केलेल्या आरोपांनी आमदार दराडे बंधू यांचे चांगलेच वस्त्रहरण झाले आहे. त्याचा नगरसेवकांच्या मतांवर परिणाम होऊ शकेल का? हा चर्चेचा विषय आहे.

महायुतीत नाशिक आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. पक्षावर चांगली पकड असलेल्या महाजन यांना विरोधी पक्षांकडून मात्र आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचे पडसाद नाशिकच्या निवडणुकीत उमटले.

महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. कुणाल दराडे यांची कथित ऑडिओ क्लिप चर्चेत आहे. त्यात गणेश गीते यांच्या बापाचा उल्लेख करत त्यांना माघार घ्यावीच लागेल अशा धमकावणीचा स्वर आहे.

Devendra Fadnavis role in Nashik MLC poll
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी मोठा ट्विस्ट, नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी? सुनेत्रा पवार अन् फडणवीसांच्या भेटीमुळे वेगळीच चर्चा

ही क्लिप सध्या वादाचा विषय बनली आहे. या संदर्भात पत्रकारांनी भाजपचे बंडखोर गणेश गीते यांना प्रश्न केला. त्यावर गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतानाही देखील दराडे यांची चांगलीच कोंडी केली. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या मुलाच्या कथेत क्लिप विषयी गीते यांनी आपला संताप व्यक्त केला.

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे आईबाप काढून त्यांचे श्राद्ध घातले जात आहे. हे कोणते संस्कार आणि राजकीय मगरुरी आहे? असा प्रश्न त्यांनी केला. उमेदवारी अर्ज मागे घेतानाही गीते यांनी आपण याबाबत तक्रार करणार नाही. मात्र हे योग्य नाही. ज्यांनी माझा बाप काढला, त्यांना हे माहीत नाही की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे बाप आहेत, असे सांगून अप्रत्यक्षरीत्या दराडे यांचीच कोंडी केली आहे.

Devendra Fadnavis role in Nashik MLC poll
Dattatray Pansare On Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंना वाड्या बाहेर पडावंच लागेल! दत्तात्रय पानसरेंना मंत्री विखेंकडून पुढच्या आमदरकीचा शब्द!

माघारीची मुदत संपली असली तरी मर्यादित मतदार असल्याने शेवटच्या दोन दिवसांपर्यंत राजकीय घडामोडी सुरू असतात. ही निवडणूक कोण किती ईर्षेने कामाला लागतो, सढळ हस्ते मतदारांना आपले स्वीकारतो याला महत्त्व असते.

त्या दृष्टीने बापापर्यंत गेलेले राजकारण काय वळण घेतील याची उत्सुकता आहे. यानिमित्ताने, मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गोवण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला हे वास्तव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com