Ajit Pawar parth pawar narendra modi.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Parth Pawar Case : पार्थ पवार प्रकरण 'दिल्ली दरबारी'! काँग्रेसच्या खासदारांनं उचललं मोठं पाऊल, थेट PM मोदींनाच लिहिलं पत्र; केली 'ही' मोठी मागणी

Congress MP Chandrakant Handore Letter to PM Narendra Modi : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पार्थ पवार जमीन गैरव्यवहारप्रकरण चांगलंच उचलून धरलं आहे. यात काँग्रेसचे सर्वच नेते आघाडीवर आहे, त्यात आता काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचीही भर पडली आहे. त्यांनी पार्थ पवार प्रकरण थेट दिल्लीत नेलं आहे.

Deepak Kulkarni

Parth Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटींची 40 एकर सरकारी जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा ठपका ठेवत राजकारण पेटवलं आहे. यात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला याप्रकरणात दुरान्वयानेही संबंध नसल्याचं सांगत हा व्यवहारच रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.पण आता पार्थ पवार (Parth Pawar) प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पार्थ पवार जमीन गैरव्यवहारप्रकरण चांगलंच उचलून धरलं आहे. यात काँग्रेसचे सर्वच नेते आघाडीवर आहे, त्यात आता काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचीही भर पडली आहे. त्यांनी पार्थ पवार प्रकरण थेट दिल्लीत नेलं आहे. त्यांनी आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत.

एकीकडे महाराष्ट्रात विरोधकांकडून सत्ताधारी महायुती सरकारवर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. याचदरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार प्रकरणी चौकशीचे आदेश देतानाच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. पण आता काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नसल्याचं हंडोरे म्हटलं आहे.

हंडोरे पत्रात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी महार मावळ्यांचे शौर्य पाहून वतन दिले होते. आता या जमिनी लाटल्या जात आहेत. तर आदिवासी दलितांना त्यांच्या जमिनी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिलेल्या पत्रातून हंडोरे यांनी केली आहे. याप्रकरणात अजित पवार यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.8) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचं प्रकरणी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. 'जो कागद होण्याचं कारण नाही, ज्याच्यात एक रुपयाही दिला गेलेला नाही, आणि तो कागद होऊ शकत नाही. अशा गोष्टी असूनही तो केला गेलेला आहे. जो कागद केला होता, त्याला ग्राह्य धरलं गेलं होतं तर त्याला आता रद्द करण्यात आलेलं आहे. हे झाल्यानंतर कुठल्या विभागानं काय कळवायचं ते कळवलेलं असल्याचं पवार यांनी म्हटलं.

यावेळी अजित पवारांनी माझी एवढीच विनंती आहे की, जे खरं असेल तेच दाखवा, परंतु जे खरं नसेल तर त्याची बदनामी करु नका', असंही म्हटलं. 'ज्या व्यवहारांची नोंदणी करताच येत नाही, त्याची तपासणी करणार आहे. ही चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल', असंही स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT