Nitin Gadkari : फायलींपेक्षा बायकोवर अधिक प्रेम करा; गडकरींनी दिला अधिकाऱ्यांना सल्ला

Gadkari officers advice News : राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापनादिन कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विनोदी शैलीत चांगलीच फटकेबाजी केली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अधिकाऱ्यांना थेट बोलतात. चुकले असले तर तोंडावर फटकारतात. वेळेत काम न करणाऱ्यांवर त्यांचा जरा जास्तच रोष असतो. त्यांचा हा स्वभाव माहीत असल्याने अनेक अधिकारी त्यांच्या समोर जाताना जरा वचकूनच असतात. शनिवारी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापनादिन कार्यक्रमात अधिकाऱ्यांनीच त्यांना प्रमुख पाहुणे बोलावले होते. ही संधी साधून गडकरी यांनी विनोदी शैलीत चांगलीच फटकेबाजी केली.

'शासकीय अधिकारी हे पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात. अनेक वर्ष विकास कामांच्या फाईल अडवून ठेवतात. तुम्हाला एक तारखेला वेळेवर पगार भेटतो मात्र कर्ज काढून कंत्राट घेणारे मात्र वर्षानुवर्षे अस्वस्थ राहतात. त्यांच्या व्यथा तुम्ही समजू शकणार नाही. काम जमत नसेल, नियमात बसत नसेल तर त्याला थेट नाही म्हणा, असा सल्ला देऊन सोबतच कानपिचक्याही गडकरी (Nitin Gadakari) यांनी दिल्या.

Nitin Gadkari
BJP Controversy: ईश्वरपूर भाजपमध्ये जुना- नवा वाद उफाळला, सम्राट महाडिकांनी मुलाखती घेताच विक्रम पाटलांनी घरीच केला 'कार्यक्रम'

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, एकदा मी एका अधिकाऱ्याला थेट विचारले होते की, तुम्ही पत्नीवर प्रेम करता ते ठीक आहे. पण, फायलींवर पत्नीहून अधिक प्रेम का करता? कारण एकदा फाईल आली की तुम्ही दाबून ठेवता. फायलींना विनाकारण दाबून का ठेवता. फायलींना मंजूर करायचे असेल तर मंजूर करा, नामंजूर करायचे असेल तर नामंजूर करा. पण, काहीतरी त्या फायलीवर लिहा आणि निर्णय घ्या. उगीचच काम रखडून ठेवण्यात काय फायदा आहे? असे गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Shivsena UBT Politics : कोल्हापूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद मिटला, मनोमिलनाची घोषणा : मुंबईत बैठक, बड्या नेत्याची मध्यस्थी

कर वसूल करा, धाडी मारा. पण, निर्णय तर घ्या. निर्णय होत नसल्याने अनेकांचे नुकसान होते. १ तारखेला पगार मिळणाऱ्याला विलंबाचा अर्थ कळत नाही, असा सल्लाही गडकरींनी दिला. संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांना सरकारमध्ये जितके महत्त्व मिळते त्यापेक्षा जास्त देण्याची गरज आहे. एखाद्या कार्यालयात अडचणीचा ठरणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्याला प्रशिक्षण संस्थेत पाठवले जाते. एकदा माझ्या सचिवांनी मला, हा माणूस काही कामाचा नाही. खूप प्राॅब्लेम क्रिएट करतो असे सांगितले. मग काय करायचे असे विचारताच याला ट्रेनिंग संस्थेत पाठवून देऊ असे ते म्हणाल्याचे गडकरींनी सांगितले.

Nitin Gadkari
NCP News : चाकणकर यांच्या विरोधातील आंदोलन भोवलं; रुपाली ठोंबरेंवर पक्षाची अ‍ॅक्शन; 7 दिवसांचा अल्टिमेटम

चहापेक्षा किटली गरम

कधी कधी प्रशिक्षण संस्थेत लायक अधिकारी देण्याऐवजी कुठेच नको असलेल्या अधिकाऱ्याला पाठवले जाते. म्हणून चांगले काम केलेल्या हुशार आणि प्रज्ञावंत निवृत्त अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग अशा ठिकाणी करावा, असे त्यांनी सुचवले. ज्ञानाचा अहंकारही मोठा असतो. "साला मै तो साहब बन गया, साहब बन के कैसा तन गया' असे अनेकांचे असते. राजकीय भाषेत याला चहापेक्षा किटली गरम असे म्हणतात. आमचे पीएसच आमच्यापेक्षा जास्त टाईट असतात असेही गडकरी यांनी विनोदाने सांगितले.

Nitin Gadkari
Nagpur Congress : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष विरुद्ध सुनील केदार वाद शिगेला : चिडलेल्या सपकाळांनी सगळी बैठकच अवैध ठरवली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com