Congress Candidates 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Congress Third list of candidates : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; जाणून घ्या, किती उमेदवारांना दिली संधी?

Congress and Vidhan Sabha Election : या यादीत अनेक दिग्ग्जांना काँग्रेसने स्थान दिलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Congress candidates list News : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 16 जणांना संधी दिलीगेली आहे. या आधी आज दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने दुसरी यादी जाहीर केली.

याशिवाय भाजपनेही दुसरी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाचवी यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसने आपल्या तिसऱ्या यादीत माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे(Manikrao Thackeray) यांना दिग्रस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर अंधेरी पश्चिम मतदारसंघातून पक्षाचे नेते सचिन सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

याधीच्या दुसऱ्या यादीत काँग्रेसने 26 उमेदवारांना संधी दिली होती आणि पहिल्या यादीत 48 जणांचा समावेश केला होता.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने(Congress) नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

याशिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर माजी मंत्री अमित देशमुख यांचे कट्टर समर्थक अभय सोळुंके यांना या आधीच्या यादीतून संधी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांचा पत्ता कट करण्यात आला असून निलंग्यातील 62 वर्षांची निलंगेकर घराण्यात उमेदवारीची परंपरा या निमित्ताने खंडीत झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागली आहे. काँग्रेसने उमेदवार बदलल्यामुळे काका-पुतण्यांमधील पारंपारिक लढत देखील यावेळी होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT