BJP Candidates 2 List : भाजपने भाकरी फिरवलीच नाही, कसबा, खडकवासला, नाशिकसह 'या' 22 मतदारसंघाचे शिलेदार ठरले

BJP ASssembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने आघाडी घेत सगळ्यात पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपने आपली 22 उमेदवारांची दुसरी यादी आता जाहीर केली आहे.
Bjp-Devendra Fadnavis
Bjp-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने आघाडी घेत सगळ्यात पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.त्यानंतर पुन्हा एकदा भाजपने आपली 22 उमेदवारांची दुसरी यादी आता जाहीर केली आहे.

शनिवारी (ता. 26) जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या (Bjp) दुसऱ्या यादीत पुण्यातील कसबा मतदारसंघातून हेमंत रासने, खडकवासल्यातून भीमराव तापकीर, 'नाशिक मध्य'मधून देवयानी फरांदे यांना दुसऱ्या यादीत संधी देण्यात आली आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीतील (Mahayuti) भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

Bjp-Devendra Fadnavis
NCP SP Candidate List : कोण आहेत दुसऱ्या यादीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिलेदार?

पहिल्या यादीत महाराष्ट्राचे भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. त्या सोबतच या यादीत भाजपने (Bjp) 13 महिलांना संधी दिली होती. तसेच मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा यात करण्यात आली होती. 

भाजपच्या दुसऱ्या यादीत सांगली जिल्ह्यातील जतमधून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तसेच पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातून सुनिल कांबळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Bjp-Devendra Fadnavis
Amit Thackeray Interview: 'माहिम'मधून मनसेची उमेदवारी जाहीर झालेल्या अमित ठाकरेंनी आपलं पुढचं ध्येयही सांगून टाकलं

धुळे ग्रामीणमधून भाजपनं राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इच्छुकांच्या गर्दीतून आतापर्यंत भाजपने एकूण 121 उमेदवार निवडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पण त्याचवेळी महायुतीतील वादात सापडलेल्या जागांवर भाजपने उमेदवार जाहीर न करता सेफ गेम खेळल्याचे दुसऱ्या यादीवरुन दिसून येत आहे. पहिल्या यादीत भाजपने (Bjp) 13 महिलांना संधी दिली होती.पण नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीत फक्त एका महिलेला संधी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com