Congress leader Satej Patil during a discussion on the Yashwantrao Chavan Legacy Fellowship and its role in nurturing future leadership in Maharashtra. sarkarnama
महाराष्ट्र

Satej Patil Politics : यशवंतराव चव्हाणांच्या वारशावर काँग्रेसचाही दावा, सतेज पाटलांच्या ट्विटने ट्विस्ट

Congress Satej Patil Yashwantrao Chavan : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यशवंतराव चव्हाण फेलोशिफ सुरू केली आहे. मात्र, या फेलोशिपच्या नावामुळे दोन्ही यशवंतराव चव्हाण यांचा विचारांच्या वारशाची चर्चा आहे.

Roshan More

Satej Patil News : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा देखील अजित पवार यांनी आमचा पक्ष धार्मिक, द्वेष मानणारा नाही असे सांगत यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे देखील यशवंतराव चव्हाण वारसा सांगत असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते असलेले सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यशवंतराव चव्हाण फेलोशिपची घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने फेलोशिपची घोषणा करत यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पाटील यांनी सांगितल्याची चर्चा आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण होते. ते आपल्या राजकारणातून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगतात. यशवंतराव चव्हाण यांचा विचार आणि वारसा यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला नेहमी पोषक असेच वातावरण राहिले आहे. यशवंतराव चव्हाणांचे निधर्मीय आणि बहुजनांचे राजकारण हे महाराष्ट्रासाठी दिशादर्शक मानले जाते.

दोन्ही राष्ट्रवादी आज देखील यशवंतराव चव्हाण यांचा वारसा विचार सांगतात. मात्र, मागील तीन चार वर्षात राज्यातील राजकारणात ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यातून एक पोकळी सध्या राजकारणात निर्माण झालेली आहे. त्यातच सतेज पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने रिसर्च फेलोशिप जाहीर करत आपण देखील हा वारसा मानत असल्याचे दाखवत काँग्रेसने तरुणांना साद घातली असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT