Satara news : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीने जागावाटप निश्चित करीत आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार जाहीर केले जात आहेत. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सातारा जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असताना याठिकाणी उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, आता माजी मंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील विश्वासू नेत्याला उमेदवारी देण्यात आली आहे.
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.
या मतदारसंघातून सातारा जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावांची चर्चा होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असताना व सांगली जिल्ह्यातून या मतदारसंघातून कोण इच्छुक असणार यासंदर्भातील नाव समोर आले नव्हते. दुसरीकडे रविवारी जयंत पाटील यांचे सांगली जिल्ह्यातील निष्ठावंत बाळासाहेब पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते.
महायुतीचा उमेदवाराची उत्सुकता
साताऱ्याची जागा महायुतीत जागा वाटपात भाजपला गेली आहे. या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपमध्ये साताऱ्यात सुनील काटकर, धैर्यशील कदम, मकरंद देशपांडे आणि शेखर गोरे यांची नावे आघाडीवर आहेत.
शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा अर्ज
सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो कायम ठेवण्यासाठीच अर्ज केल्याचं म्हटले आहे. त्यामुळे सातारा सांगलीच्या जागेवर तानाजीराव पाटील यांचा अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास निवडणूक तिरंगी होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.