Mahavikas Aghadi  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : मोठी बातमी! 'मविआ'ची जागा वाटप फायनल; काँग्रेस 115, शिवसेना 'UBT' 86 अन् राष्ट्रवादी 'SP' 75

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अखेर सुटत चालला आहे. महाराष्ट्रातील 288 पैकी 260 जागांवर महाविकास आघाडीत सहमती झाली आहे.

उर्वरीत जागांचा तिढा लवकरच सोडवला जाणार असून, पुढील दोन दिवसांत तो तिढा देखील सोडवला जाणार आहे. याशिवाय जागा वाटपात समविचार पक्षांना देखील समावून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटपावर बैठक सुरू आहे. 288 पैकी 260 जागांवर तिढा या बैठकीत सुटला आहे. यात काँग्रेस (Congress) 110 ते 115, शिवसेना (UBT) 83 ते 86 आणि NCP (SP) 72 ते 75 जागा लढवण्यावर निश्चिती झाली आहे. वादग्रस्त 20 ते 25 जागांवरचा तिढा देखील लवकर सुटेल, असे महाविकास आघाडीकडून सांगितले जात आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये विशिष्ट जागा खेचून घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. परंतु निवडून येण्याची क्षमता, हाच निकष असल्याने जागा वाटपाचा घोळ सोडवणं काहीसं सोपं होत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, माजी मंत्री आमदार अनिल परब सहभागी झाले आहेत.

मित्रपक्षांचा विचार

महाविकास आघाडीने जागा वाटपात मित्र पक्षांचा देखील विचार केला आहे. समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी आणि कामगार पक्षाने प्रत्येकी 12 जागा जागांवर दावा केला होता. यात कोणतीही तडजोड होणार नाही, असा महाविकास आघाडीला इशारा दिला होता. या पक्षांना महाविकास आघाडीतील प्रत्येकी दोन ते तीन जागा मिळणार आहेत.

जागा वाटपात पक्षांच्या प्रभावाचा विचार

जागा वाटपात काही भौगोलिकदृष्ट्या पक्षांचा प्रभाव असल्याचा देखील विचार करण्यात आला आहे. मुंबई, कोकणात ठाकरेंचा दबदबा आहे. त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे तिथं शिवसेना ठाकरे पक्षाकडून सर्वाधिक जागांचा मागणी होत होती. त्याचा विचार करण्यात आला आहे. तसंच विदर्भात काँग्रेस जास्त जागा लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT