Uddhav Thackeray : भाजपचा बडा नेता ठाकरेंनी फोडला, CM शिंदेंच्या मंत्र्याविरुद्ध लढणार?

Uddhav Thackeray Shivsena : उद्धव ठाकरे यांनी महायुतीला मोठा धक्का दिला आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील दीपकआबा साळुंखे आणि चिंचवड येथील मोरेश्वर बोंडवे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यासह भाजपच्या एक बडा नेताही ‘मशाल’ हाती घेणार आहे.
eknath shinde  | uddhav thackeray | devendra fadnavis.jpg
eknath shinde | uddhav thackeray | devendra fadnavis.jpgsarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला झटक्यांवर झटके दिले आहेत. महायुतीतील तीन नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत आज प्रवेश होता. त्यातील महत्त्वाचा प्रवेश म्हणजे राजन तेली यांचा. राजन तेली हे भाजपला ‘रामराम’ ठोकत ठाकरेंची ‘मशाल’ हाती घेत आहेत. ठाकरेंची साथ सोडलेल्या मंत्री दीपक केसकर यांच्याविरुद्ध राजन तेली यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे तेली यांच्या माध्यमातून वचपा काढू शकतात.

सातत्यानं या-ना त्या कारणानं दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांना ‘टार्गेट’ करणाऱ्या राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजन तेली हे केसकरांविरोधात लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, महायुतीकडे ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे.

दीपक केसरकर यांना सावंतवाडी येथून पुन्हा उमेदवारी मिळू शकते. शिवसेनेतील फुटीनंतर दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना साथ दिली होती. तसेच, शिंदे गटाची बाजू सांभाळण्याचं कामंही केसरकर यांनी केलं होतं. तेव्हापासून केसरकर हे ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत. केसकरांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी ‘व्यूहरचना’ आखली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे राजन तेली यांना सावंतवाडीतून केसरकर यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राजन तेली यांचा ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. तेली यांनी खासदार नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडली होती. आता राजन तेली पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

eknath shinde  | uddhav thackeray | devendra fadnavis.jpg
Deepak Salunkhe : दीपकआबा देणार शहाजीबापूंना टक्कर, ‘मशाल’ पेटवणार; सांगोल्यात शेकाप बंडखोरी करणार?

2014 अन् 2019 मध्ये केसकरांविरोधात निवडणूक लढली....

2009 मध्ये दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सावंतवाडी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानं 2014 मध्ये राजन तेली यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. केसरकर यांना 70,902 आणि राजन तेली यांना फक्त 29,710 मते मिळालेली.

eknath shinde  | uddhav thackeray | devendra fadnavis.jpg
Congress first list: कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी; पण धंगेकरांनी शेअर केलेली पहिली यादी डिलीट

2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युती झाली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून केसकरांनी पुन्हा निवडणूक लढवली. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. 2019 च्या निवडणुकीत केसरकर यांना 69,784 तर तेली यांना 56,556 मते मिळाली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून तेली यांना उमेदवारी मिळाल्यास केसरकरांना निवडणूक ‘टफ’ जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com