Prajna Satav joins BJP Sarkarnama
महाराष्ट्र

Pradnya Satav : "राजीव भाऊंचे आशीर्वाद..." असं म्हणत भाजपमध्ये प्रवेश करण्याऱ्या प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं करून दिली 'ही' आठवण

Rajiv Satav legacy politics Maharashtra : "राजीव भाऊंचे आशीर्वाद" म्हणत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं 'ही' आठवण करून दिली.

Rashmi Mane

“राजीव भाऊंचे आशीर्वाद, देवा भाऊची साथ, सर्व जण मिळून करू सगळ्या संकटांवर मात” असे म्हणत प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. या घडामोडीनंतर काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावरून भावनिक प्रतिक्रिया देत सातव कुटुंबाशी असलेल्या जुन्या नात्याची आठवण करून दिली आहे.

या 'पोस्ट'मधून काँग्रेसने थेट कोणावरही टीका न करता, राजीव सातव आणि त्यांच्या मातोश्री स्वर्गीय रजनीताई सातव यांची काँग्रेसशी असलेली नाळ कोणीही तोडू शकत नाही!, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.

काँग्रेसने आपल्या 'एक्स'वरील अधिकृत पेजवर पोस्ट करत म्हटले आहे की, "स्वर्गीय राजीव सातव आणि त्यांच्या मातोश्री स्व. रजनीताई सातव यांचे काँग्रेस पक्षासाठी योगदान अमूल्य राहिले. सातव कुटुंब हे फक्त काँग्रेसचे नेतेच नाही तर पक्षातील एक कुटुंब होतं. पक्षाने सगळे देऊनही पक्ष सोडण्याचा कोणी निर्णय घेत असेल तर तर ती त्यांची भूमिका आहे.

आज राजीव सातव आणि रजनीताई असते तर या निर्णयाने त्यांना नक्कीच धक्का बसला असता आणि दुःख झालं असते. राजीव सातव, रजनीताई आणि काँग्रेसची नाळ कोणीही तोडू शकत नाही!," असं काँग्रेसने स्पष्ट केलं.

पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कोणी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असेल, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, काँग्रेसने हेही या पोस्टमध्ये नमूद केलं की, आज जर राजीव सातव आणि रजनीताई सातव हयात असते, तर या निर्णयामुळे त्यांना नक्कीच धक्का बसला असता आणि मनापासून दुःखही झालं असतं.

याचे कारण म्हणजे, राजीव सातव हे केवळ पक्षाचे नेते नव्हते, तर ते काँग्रेस कुटुंबाचा अविभाज्य भाग होते. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात पक्षासाठी सातत्याने काम केले आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नातं निर्माण केलं.

दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसला धक्का, पोकळी निर्माण झाली अशा विशेषणांचा वापर सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT