Mumbai News : महिनाभरातच काँग्रेसला दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची नामुष्की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे आली आहे. महिनाभरापूर्वीच राज्यात पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यासाठी हालचाल करण्यास सुरुवात केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार असल्याने व निवृत्त होत असलेली जागा शरद पवार यांची असल्याने काँग्रेसला ही जागा सोडावी लागली तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात उतरल्या असल्याने त्यांच्यासाठी काँग्रेसला दुसऱ्यांदा तलवार म्यान करावी लागली. त्यासोबतच बारामतीत ऐन शेवटच्या क्षणी काँग्रेसने निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचे नेमके कारण समोर आले आहे.
राज्यातील सहा जागेसाठी गेल्या महिन्यात निवडणुकीची घोषणा झाली होती. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला पाच तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार होती. या एकमेव जागेसाठी कॉंगेसनेही जोर लावला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला माघार घ्यावी लागली होती. तर दुसरीकडे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांमधील एकूणच निरुत्साह, लढण्यापूर्वीच पराभूततेची मानसिकता, स्थानिक पातळीवर कमकुवत संघटना हे सारे मुद्दे विचारत घेऊन बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली. राज्यसभेपाठोपाठ बारामतीमध्ये पवारांसाठी काँग्रेसला तलवार म्यान करावी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनी हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढण्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले होते. काँग्रेसने माजी आमदार विजयराव मोरे यांचे पुत्र ॲ़ड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. बारामतीमध्ये निर्धाराने लढण्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे सारे दिग्गज नेते उपस्थित होते. याउलट काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह कोणीही नेता फिरकला नव्हता. तेव्हाच काँग्रेस ही पोटनिवडणूक लढण्यावर गंभीर नाही हेच संकेत मिळाले होते. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक होत असताना काँग्रेसने ती लढविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अन्य पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती.
बारामती लढण्यावरून काँग्रेसमध्ये आधीच दोन मतप्रवाह होते. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ही पोटनिवडणूक लढण्याबाबत पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली असता लढण्याबाबत पक्षात फारसा उत्साह जाणवला नाही. प्रचारासाठी नेतेमंडळींनी बारामतीमध्ये जाण्याचे टाळले असते. तसेच माघारीची मुदत संपल्यावर पुढील 10 ते 12 दिवस प्रचार करण्याचे मोठे आव्हान होते.ax
बारामती किंवा पुणे जिल्ह्यात काँग्रेसची (Congress) ताकद आधीच कमकुवत. विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली. जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये लढण्याबाबत फारसा उत्साह दिसत नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.