Maoist Leader Basava Raju Sarkarnama
महाराष्ट्र

Maoist Basava Raju death news : जहाल बसवा राजू गद्दारांमुळे मारला गेला; केंद्र सरकाराच्या विकसित भारताला ‘कार्पोरेट हिंदू राष्ट्र’ म्हणत नक्षलींची टीका

CPI Maoist Basava Raju Killed in Chhattisgarh Encounter Dandakaranya Naxal Division Claims Betrayal : बसवा राजू हा संघटनेतील गद्दारांमुळे मारला गेल्याची कबुली नक्षलवादी दंडकारण्य विशेष विभाग प्रवक्ता विकल्प याने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Pradeep Pendhare

Maoist leader killed Chhattisgarh : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

या कारवाईमध्ये सीपीआय-माओवादी पक्षाचा जनरल सेक्रेटरी आणि नक्षली चळवळीचा कणा म्हणून ओळखला जाणारा नंबाला केशव राव उर्फ ​​बसवा राजू हा देखील ठार झाला होता. तो 28 वा नक्षली होता. बसवा राजू हा संघटनेतील गद्दारांमुळे मारला गेल्याची कबुली नक्षलवाद्यांचा दंडकारण्य विशेष विभाग प्रवक्ता विकल्प याने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. प्रवक्ता विकल्प या दाव्यामुळे नक्षलीमध्ये जवळपास फूट पडल्याचे दिसते.

छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात 21 मे रोजी पोलिसांशी (Police) झालेल्या चकमकीत 28 नक्षली ठार झाले होते. पोलिसांनी 27 ठार झाल्याचे म्हटले. मात्र, ती संख्या 28 असून एका नक्षलवाद्याचा मृतदेह दलमच्या सदस्यांनी नेले होते. तो मृतदेह नंबाला केशव राव उर्फ ​​बसवा राजू याचा होता. याशिवाय, केंद्र सरकार विकसित भारत निर्माण करण्याच्या नावाखाली ‘कार्पोरेट हिंदू राष्ट्र’ निर्माण करत असल्याची टीकाही या पत्रकातून नक्षलवादी संघटनने केली आहे.

विकल्पने पत्रकात नमूद केल्यानुसार 21 मे रोजी झालेल्या चकमकीच्या वेळी 35 नक्षलवादी होते. त्यापैकी 28 नक्षलवादी (Naxal) ठार झाले. बसवा राजूला कंपनी क्रमांक सातचे सुरक्षा कवच होते. या कंपनीत जानेवारीपर्यंत 60 नक्षलवादी होते. परंतु नंतर ही संख्या कमी करून घटनेच्या वेळी केवळ 35 नक्षलवादी त्याच्या सुरक्षेत तैनात होते.

एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या पोलिसांच्या मोहिमेविषयी आम्हाला पूर्वकल्पना होती. परंतु, सुरक्षित ठिकाणी जाण्यास बसवा राजू तयार नव्हता, असेही विकल्पने म्हटले आहे. या चकमकीपूर्वी, पोलिसांनी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील 26 माओवाद्यांना ठार करण्यात आले होते.

ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. मोदी सरकारने 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला आहे. ही शोधमोहिम अद्यापही सुरु आहे. लाल दहशतवादापासून छत्तीसगडला मुक्त करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे छत्तीसगड सरकारने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT