Devendra Fadnavis Manoj Jarange Patil sarkarnama
महाराष्ट्र

Jarange Vs Fadnavis : जरांगे-पाटलांचे गंभीर आरोप, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Akshay Sabale

सगेसोगयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. अशातच मनोज जरांगे-पाटील यांनी आज ( 25 फेब्रुवारी ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मला संपवण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी रचलं आहे. त्यातून वेगवेगळी लोक पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं. या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ( Devendra Fadnavis Latest News )

मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?

"मला संपवण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी रचलं आहे. त्यातून वेगवेगळी लोक पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल, तर मी आज सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार," अशी घोषणा जरांगे-पाटलांनी केली. यानंतर जरांगे-पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे-पाटलांच्या आरोपांबाबत साताऱ्यातील आंधळी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांना विचारलं. त्यावर फडणवीसांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे. "मी काही ऐकलं नाही, ऐकून उत्तर देईन," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

फडणवीसांवर झालेल्या आरोपानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे. "जरांगे-पाटलांचा लढा आरक्षणासाठी आहे की फडणवीसांना लक्ष्य करण्यासाठी आहे. जरांगे-पाटील वाचून दाखवत असलेली स्क्रिप्ट कुणी लिहिली आहे. कारण, या स्क्रिप्टवरून मला तुतारीचा वास येत आहे. हा लढा मराठा समाजासाठी असेल, तर समाजापुरताच मर्यादित ठेवावा. जरांगे-पाटलांनी राजकारण केलं, आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल," असं नितेश राणेंनी म्हटलं.

"आमच्या सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं असून, मराठा समाजानं ते स्वीकारलं आहे. जरांगे-पाटलांचं समाधान होत नसल्यानं ते फडणवीसांवर टीका करत आहेत. तर आम्ही मराठेही येथे उभे आहोत," असं नितेश राणेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT