Pooja Khedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Pooja Khedkar : पूजा खेडकरला अटक होणार का? न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश

High Court UPSC Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी आपल्या खासगी गाडीला अंबर दिवा लावल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. पुढे त्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे देखील समोर आले होते

Roshan More

Pooja Khedkar News : बनावट अपंगपत्राद्वारे IAS केडर मिळवणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अटकेबाबत दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास पुढील 10 दिवसांत करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांनी दिले आहेत. तसेच पूजा खेडकर यांना दिलासा देत 26 सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचेही निर्देश दिले आहेत.

26 सप्टेंबरला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी पूजा यांच्या अटकेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पूजा खेडकर यांनी आपल्या खासगी गाडीला अंबर दिवा लावल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. पुढे त्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे देखील समोर आले होते. त्यामुळे यूपीएससीने पूजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्या विरोधात पोलिसामध्ये तक्रार केली होती.

पूजा यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. 29 ऑगस्टला झालेल्या सुनावणीमध्ये पूजा यांना पाच सप्टेंबर पर्यंत अटकपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) होणाऱ्या सुनावणीमध्ये न्यायालय का निर्णय देणार याची उत्सुकता होती. मात्र, न्यायालयाने पूजा यांना 26 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण देत पोलिसांना 10 दिवसांत सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

तारीख पे तारीख

यूपीएससीने पूजा खेडकर यांना अपात्र घोषित करत त्यांचे IAS पद रद्द केले. त्याविरोधात पूजा या न्यायालयात गेल्या आहेत. न्यायलयात पूजा यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात तारखी पे तारीख न्यायालयाकडून दिली जात आहे.

कागदपत्र पोलिसांच्या ताब्यात

पूजा यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांचे अहमदनगरमधील मूळगाव भालगाव (ता.पाथर्डी) मध्ये ऑगस्ट महिन्यात येऊन तपास केला होता. पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबांशी निगडीत असलेली महत्त्वपूर्ण कागदपत्र दिल्ली पोलिसांनी पाथर्डी तहसील कार्यालयातून ताब्यात घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT