Pune Assembly Elections : राष्ट्रवादीतल्या फुटीतून पुणे जिल्हा काबीज करण्याचा काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन'

Pune Assembly Elections Nana Patole Congress : 2019 मध्ये पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी 10 विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. त्या खालोखाल भाजपला 9 जागांवरती विजयी झाली. तर काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या.
Sharad Pawar Nana Patole
Sharad Pawar Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 10 जागा आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसचे तीन आमदार सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ही संख्या वाढवण्याचा आणि पुणे जिल्हा काबीज करण्याचा 'मास्टर प्लॅन' काँग्रेसकडून आखला जातोय का ? आणि त्यासाठी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच लक्ष करण्यात येणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

2019 च्या निवडणुकीत दहा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. त्या खालोखाल भाजपा देखील नऊ जागांवरती विजयी झाली. तर काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागले होते. कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करत काँग्रेसने विजय साकार केला. त्यामुळे सध्या पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारांची संख्या ही तीनवर पोहोचली आहे. मात्र, यंदा आमदारांची संख्या वाढवण्यासाठी काँग्रेसने मास्टर प्लॅन आखला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची कामगिरी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने केली तीच कामगिरी विधानसभा निवडणुकीत देखील करण्याचे मानस सध्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरती विविध स्ट्रॅटर्जी आखण्यात येत आहेत.

Sharad Pawar Nana Patole
Unmesh Patil Politics: पाटलांच्या खेळीने भाजपची कोंडी?, खानदेशच्या ३२ मतदारसंघात पसरणार नार-पार आंदोलन?

यातीलच एक स्ट्रॅटर्जी काल (बुधवारी) झालेल्या पुण्याच्या बैठकीत उघड झाली का ? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. बुधवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पटोले यांनी आगामी निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेला फुटीचा फायदा घेण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

नाना पटोलेंचा कानमंत्र

या बैठकीत नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत त्याचा आपण फायदा घेऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जास्तीच्या जागा आपण पदरात पाडून घेऊ. पुण्यामध्ये काँग्रेसचे संघटन पूर्वीपासून मजबूत राहिले आहे.

पुण्यात काँग्रेसची ताकद आहे. मात्र आता सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. संघटनात्मक बैठका ब्लॉकच्या मीटिंग वेळेवरती व्हायला हव्यात.तसेच अंतर्गत मतभेद मिटवून उमेदवार कोण आहे. यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व देणे आवश्यक आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे. असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

...तर आघाडीत बिघाडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहेत. तरी देखील त्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा दावा सांगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तो दावा खोडून त्या जागा देखील आपल्याकडे घेऊन आमदारकीची संख्या वाढवण्याचा प्लॅन काँग्रेस कडून आखण्यात आला आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ही काँग्रेसची स्ट्रॅटर्जी महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचे काम करू शकते, असे बोलले जात आहे

(Edited By Roshan More)

Sharad Pawar Nana Patole
Dr Advay Hiray Politics: अद्वय हिरेंचा आरोप, पालकमंत्री भुसे उद्योजकांकडे भागीदारी मागतात!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com