Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात पुन्हा तारीख पे तारीख...

Pooja Khedkar And UPSC News : महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले होते. सर्व प्रमाणपत्रांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
IAS Pooja khedkar
IAS Pooja khedkarSarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar News : आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर (Pooja khedkar) यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

दिल्ली उच्च न्यायलयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. पूजा खेडकर यांना 5 सप्टेंबरपर्यंत अटक न करु नये, असं न्यायालयाने सांगितलं आहे. युपीएससीने पूजा खेडकर यांना दोषी ठरवत त्यांचे उमेदवारी रद्द केली आहे.

महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले होते. सर्व प्रमाणपत्रांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, यूपीएससीने (UPSC) पूजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावत अनेक आरोप केले होते. शिवाय या प्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

IAS Pooja khedkar
Eknath Shinde On Deepak Kesarkar : 'घोषणा नको कृती करा...', CM शिंदेंकडून केसरकरांना समज; नेमकं प्रकरण काय?

मात्र, पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सर्व आरोप फेटाळून लावत. UPSC खोटं बोलत असल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं. आपली निवड रद्द करण्याचे कोणतेही अधिकारी आयोगाकडे नसल्याचा दावाही त्यांनी केला होता.

IAS Pooja khedkar
Darshan Thoogudeepa: खुनाच्या आरोपातील सुपरस्टारला जेलमध्ये रॉयल ट्रीटमेंट; मुख्यमंत्र्यांचा पारा चढला अन्...

दरम्यान, याच प्रकरणी आता खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पूजा खेडकर प्रकरणात हे तारीख पे तारीख आणखी किती दिवस चालणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com