Praful Patel Amit Shah Piyush goel .jpg Sararnama
महाराष्ट्र

NCP Politics: दिल्लीत मोठी राजकीय घडामोड! प्रफुल्ल पटेलांनी घेतली अमित शहांची भेट, मंत्री गोयल यांचं प्रकरण कानावर घातलं..?

Praful Patel Meet Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या प्रफुल पटेलांनी मंगळवारी (ता.3) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत पटेलांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचं प्रकरणही शहांच्या कानावर घालत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्य आणि वाटचालीवर अनेक चर्चांना सुरू झाल्या आहेत. यात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचा दावा करत मोठी खळबळ दिली होती. याचदरम्यान,आता दिल्लीत मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या प्रफुल पटेलांनी मंगळवारी (ता.3) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत पटेलांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचं प्रकरणही शहांच्या कानावर घालत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. यानंतर अमित शहांनी गोयलांना चांगलेच फटकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पियूष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होईल असं मला वाटत नाही. अजित पवारांनी महायुतीत उत्कृष्टपणे काम केले आहे. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करतील. प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे,अशी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला असतानाच गोयलांनी ही पोस्ट केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले...?

खासदार प्रफु्ल्ल पटेल म्हणाले, केंद्रीय मंत्र्याला चुकून काही तरी माहिती दिली. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असेल. पवार आणि अजितदादांसोबत मी काम केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावरच राहील. मी कार्यकारी अध्यक्ष आहे. विधीमंडळ आणि राजकीय पक्ष असे दोन पार्ट आहे. विधीमंडळ आणि पक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावर आणि राज्यात तटकरेंवर असल्याचंही पटेलांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

राष्ट्रवादीत कोणत्याही व्यक्तीने इंडिकेशनही दिले नाही. सर्वांच्या भावना समजतात तसा आम्ही सुनेत्राताईंची निवड केली. पक्षाचा निर्णय हा प्रक्रियेनेच होणार आहे. कोणी विलिनीकरणाचा वाद, कोणी अमूकच अध्यक्ष कसं बनलं पाहिजे, हे सांगत आहे. तर काही लोकांनी कधी निवडणूक लढवली नाही,. कधी लोकांनी एक मतही त्यांना दिलं नाही. ते लोक आम्हाला सल्ला दिल्याचा सांगत पटेलांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

याचवेळी प्रफुल्ल पटेलांनी यावेळी विरोधकांवर हल्लाबोल केला.ते म्हणाले, माझे वडील राज्यातून निवडून येत होते. मलाही निवडून दिलंय. आमच्या कुटुंबाबत आणि माझ्याबाबत कोणी बोलत असेल तर त्याला लाज वाटली पाहिजे, असा जोरदार पलटवारही पटेल यांनी केला.

पटेलांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचा निवड योग्यच आहे. योग्य प्रक्रियेने ही होणार असल्याचंही सांगितलं. तसेच राष्ट्रवादीच्याअध्यक्षपदी योग्य नेता निवडला जाईल. आणि तोही माझ्याशिवाय अध्यक्ष निवडला जाणार आहे. माझ्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अध्यक्षपद मिळेल. मी अध्यक्षपदी राहणार नाही. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मीच काम करणार आहे अशी स्पष्ट भूमिकाही प्रफुल पटेल यांनी मांडली.

प्रफुल पटेल म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा असा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नसल्याचं त्यांनी अधोरेखित केली. तर अगोदर आमच्या पक्षातील विषय मार्गी लागू द्या असं आवाहनही त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते पियुष गोयल?

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होईल असे मला वाटत नाही असं म्हटलं होतं. तसेच अजित पवारांनी महायुतीत उत्कृष्टपणे काम केले आहे. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करतील. प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली असा दावाही त्यांनी केला होता. याचवेळी त्यांनी शरद पवारांनी लोकांचा विश्वास व मते या दोन्ही गोष्टी गमावल्या आहेत. यामुळे त्यांना पुन्हा पक्षात निमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही,असंही स्पष्ट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT