

Nashik Mayor BJP News: नाशिक महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी अडके यांचे नाव निश्चित केले. त्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर होणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय झाला. नाशिक महापौरपदाची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. भाजपने महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव निश्चित केले. उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची घोषणा झाली आहे.
यंदाचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. त्यासाठी श्रीमती आडके, दिपाली गीते आणि दिपाली कुलकर्णी ही नावे चर्चेत होते. मात्र सर्वाधिक अनुभवी आणि निष्ठावंत हा निकष आडके यांच्या पथ्यावर पडला आहे. भाजपची सत्ता असताना यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे दिपाली कुलकर्णी यांचे नाव आपोआप मागे पडले.
दिपाली गीते या पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. त्यांचे पती गणेश गीते स्थायी समितीचे माजी सभापती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपविरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाला पक्षातील निष्ठावंत नगरसेवकांचा प्रखर विरोध होता. यामुळे नगरसेवकांमध्येच आडके यांच्या विषयी अनुकूलता निर्माण झाली होती.
आडके या अनुभवी आणि भाजपच्या निष्ठावंत मांडल्या जातात. त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील बाळासाहेब आहेर भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती आहे. त्यांच्या मातोश्री शोभना आहेर याही माजी उपमहापौर होत्या. याशिवाय माजी आरोग्य मंत्री डॉ दौलतराव आहेर यांच्या पुतणी आहेत. तर भाजप आमदार राहुल आहेर यांच्या चुलत बहीण आहेत.
हिमगौरी आडके यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगल्या संपर्क आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले वजन वापरले. मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा दुहेरी कार्डमुळे श्रीमती आडके यांचे नाव अंतिम होण्यासाठी राजकीय प्रयत्न फळाला आले.
मराठा-ओबीसी समतोल :
आडके या मराठा समाजाली चेहरा आहेत. यापूर्वी 2002 मध्ये शिवसेनेचे दशरथ पाटील महापौर झाले होते. त्यानंतर ओबीसी आणि अन्य समाजाला महापौर पदासाठी संधी मिळाली होती. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्चविद्याविभूषित म्हणून श्रीमती अडके यांचे नाव निश्चित होताना हा निकष महत्त्वाचा ठरला.
त्याचवेळी उपमहापौरपदावर मच्छिंद्र सानप यांना संधी देऊन ओबीसी समाजालाही प्रतिनिधित्व दिले आहे. या निवडीतून भाजपने मराठा आणि ओबीसी असा समतोल साधल्याचे चित्र आहे. महापौरपदासाठी मराठा चेहरा देताना ओबीसी समाज नाराज होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. मच्छिंद्र सानप हे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे यांचे चिरंजीव आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.