Omraje Nimbalkar News : आजोबाला आणि पप्पाला लाखाच्या मताने पाडलं, मम्मीनी दोघांचा रेकाॅर्ड मोडला; आता लोकसभेला तू ये, दाखवतोच! ओमराजेंचं मल्हार पाटलांना ओपन चॅलेंज

Omraje Nimbalkar News : धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना खुले राजकीय आव्हान दिले आहे. यामुळे धाराशीवमधील पारंपारिक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.
Shiv Sena MP Om Raje Nimbalkar addressing a public gathering in Dharashiv, where he issued a direct political challenge to Malhar Patil, escalating the long-standing local rivalry.
Shiv Sena MP Om Raje Nimbalkar addressing a public gathering in Dharashiv, where he issued a direct political challenge to Malhar Patil, escalating the long-standing local rivalry.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP News : ' ते मल्हू पाटील मला म्हणतंय, जिल्हा परिषद जिंकून दाखव. त्याला म्हणावं इथं गल्लीत ग्रामपंचायत, नगरपंचायत काय करतोयं. तुझ्या आजोबाला आणि पप्पाला लाखाच्या मताधिक्यांनी लोकसभेला पाडला. मम्मीनी तर या दोघांचा रेकाॅर्ड मोडलायं. तु काय मला चॅलेंज देतो जिल्हा परिषदेचं, मीच तुला देतो ये लोकसभेला तुला दाखवतो' अशा शब्दात धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांना खुले आव्हान दिले. पैशांच्या जोरावर नगरपालिका जिंकणाऱ्यांनी मस्ती दाखवायची नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

धाराशीव जिल्ह्यातील खेडमध्ये ओम राजेनिंबाळकर यांची जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसाठी सभा पार पडली. यावेळी त्यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, अर्चना पाटील आणि मल्हार पाटील यांच्यावर टीका केली.

काही दिवसांपूर्वी मल्हार पाटील यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जिल्हा परिषद निवडणूक जिंकून दाखवं, असे आव्हान दिले होते. यावर त्यांनी प्रत्युत्तर देताना सलग तीन लोकसभा निवडणुकीत आजोबा, पप्पा आणि मम्मीला हरवलं, आता तु ये तुला दाखवतो, असे म्हणत डिवचले.

Shiv Sena MP Om Raje Nimbalkar addressing a public gathering in Dharashiv, where he issued a direct political challenge to Malhar Patil, escalating the long-standing local rivalry.
BJP News : 'आवाज कुणाचा' म्हणणाऱ्यांचाच आवाज दबला; संभाजीनगर महापालिकेवर 20 वर्षे एकहाती वर्चस्व गाजवणारी 'शिवसेना' भाजपकडून बेदखल

नगरपालिका निवडणुकीत आमच्याकडे फुकटचा दामोजीराव नव्हता म्हणून आम्ही हरलो. नगरपालिका निवडणुकीत एका गावात 3200 मतदान असतं. आता त्या सगळ्यांना सोन्याच्या अंगठ्या दिल्यावर ते आम्हाला कशाला मतदान करतील? असा सवाल करत ओमराजे यांनी नगरपालिका निवडणुकीत सोन्याच्या अंगठ्या वाटल्या गेल्याचा गंभीर आरोप केला.

Shiv Sena MP Om Raje Nimbalkar addressing a public gathering in Dharashiv, where he issued a direct political challenge to Malhar Patil, escalating the long-standing local rivalry.
Sanjay Jadhav Shiv Sena: बाबाजानी दुर्राणींमुळे 'झेडपी'त वाट बिकट; ठाकरेंच्या शिलेदाराने डागली तोफ...

42 वर्ष एकाच कुटुंबानं सत्ता उपभोगली, पण त्यांना धाराशीवमध्ये एक शासकीय महाविद्यालय, रुग्णालय आणता आले नाही. चार दशकात त्यांनी जिल्ह्यातील एक पोरगं डाॅक्टर करून दाखवलं असेल तर समोर आणून दाखवावं, नेरूळला चॅरिटेबल हाॅस्पीटल काढलं पण त्यांचे सदस्य सगळे कोण? तर एकाच कुटुंबातले, असे म्हणत ओमराजे यांनी राणाजगजीतसिंह पाटील आणि कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com