Walmik Karad sarkarnama
महाराष्ट्र

Walmik Karad : कोट्यवधींचा मालक वाल्मिक कराड पण 35 हजारांचा दंड थकवला! काय आहे प्रकरण?

Walmik Karad Pending 35 Thousand Fine : वाल्मिक कराड याने खंडणीतून पैसे जमवल्याचे आणि त्यातून संपत्ती जमा केल्याचे आरोप आहेत. कोट्यावधी रुपयांचे प्लॅट, रो हाऊस त्याचबरोबर जमीन आणि मोठ मोठी महागडी वाहन त्याच्याकडे होती.

Roshan More

Walmik Karad News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा कोट्यावधींचा मालक आहे. त्याच्या नावे कोट्यावधी गाड्या, गाळे, प्लॅट, जमिनी असल्याचे समोर येत आहे. खंडणीतून त्याने ही माया जमवल्याचे आरोप होत आहे.

वाल्मिक कराडकडे मर्सिडीड, बीएमडब्लू, फोर्ड एण्डेव्हर अशा महागड्या गाड्या आहेत. सीआयडीने वाल्मिक कराडची वाहने जप्त करण्यासाठी केज न्यायालयात अर्ज केला आहे.

कोट्यावधींचा मालक असलेल्या वाल्मिक कराडच्या गाड्यांवर 35 हजार दंड थकीत असल्याचे समोर आले आहे. कोट्यावधींच्या गाड्या घेऊन फिरणारा कराड 35 हजाराचा दंड भरू न शकल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कराडकडे असलेल्या मर्सिडीज गाडीवर सर्वाधिक 12 हजाराचा दंड आहे. तर सर्वात कमी टेम्पोवर 1700 रुपये दंड आहे.

संपत्तीवर येणार टाच

वाल्मिक कराड याने खंडणीतून पैसे जमवल्याचे आणि त्यातून संपत्ती जमा केल्याचे आरोप आहेत. कोट्यावधी रुपयांचे प्लॅट, रो हाऊस त्याचबरोबर जमीन आणि मोठ मोठी महागडी वाहन त्याच्याकडे होती. त्याने काही संपत्ती नातेवाईकांच्या नावे घेतल्याची देखील माहिती आहे. एसआयटीकडून कारवाई करत कराड संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.

1500 पानांचे दोषारोपपत्र

सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोप असल्याचे सांगण्यात आले आहे. वाल्मिक कराड याला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र, दोषारोपपत्रात हत्ये मागचा तोच मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT