Santosh Deshmukh Murder : "100 जणांपेक्षा एक 'वाल्मिक अण्णा' सांभाळा"; सुदर्शन घुलेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Dehsmukh Murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आरोपी सुदर्शन घुले हा अवादा कंपनीकडे वाल्मिक कराडच्या नावे खंडणी मागतानाचा मोठा पुरावा पोलीसांना मिळाला आहे.
 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Walmik Karad Santosh Deshmukh Murdersarkarama
Published on
Updated on

Santosh Dehsmukh Murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आरोपी सुदर्शन घुले हा अवादा कंपनीकडे वाल्मिक कराडच्या नावे खंडणी मागतानाचा मोठा पुरावा पोलीसांना मिळाला आहे. त्यामुळे कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुले खंडणी मागतानाचा व्हिडीओच पोलिसांना हाती लागला आहे. हा व्हिडीओ पुराव्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

यात 'शंभर लोक सांभाळण्यापेक्षा एक वाल्मीक कराड (Walmik Karad) सांभाळा, अण्णांची मागणी पूर्ण करा, सगळे सुरळीत होईल, अन्यथा तुमची सगळी कामं बंद केली जातील' अशी 'समज' सुदर्शन घुले संबंधित अधिकाऱ्यांना देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे स्पष्ट झाले आहे.

सुरुवातीला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मीक कराड याने अवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यात त्याने सुदर्शन घुलेला पाठवत असल्याचे सांगतानाचा पुरावाही तपास पथकाला मिळाला आहे. वाल्मीक कराडच्या निर्देशानुसार सुदर्शन घुले अवादा कंपनीच्या मस्साजोग येथील प्रकल्पास्थळी गेल्यानंतर तो खंडणी मागतानाचा व्हिडिओ तिथल्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केला होता.

 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Santosh Deshmukh Case Update : कराड, घुले, आंधळेच्या कोट्यवधीच्या 'रसद'वर घाव; 'मर्सिडीज', 'बीएमडब्ल्यू'सारखी अलिशान 10 वाहनं जप्त

कुणालाही विरोध करा, पण अण्णांना नको : सुदर्शन घुलेची समज

'तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एक वाल्मीक अण्णा कराड सांभाळा. तुम्हाला कोणताही 'त्रास होणार नाही. वाल्मीक अण्णांनी मागितलेले दोन कोटी रुपये देऊन टाका. तुमचे काम सुरू होईल. यापूर्वी मी आलो होतो, तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती. ही गोष्ट वाल्मीक अण्णांना कळली. ते तुमच्यावर संतापलेत. त्यामुळे वाल्मीक अण्णांची मागणी पूर्ण करा, अन्यथा तुमची सर्वच कामे बंद केली जातील.

तुमचे व अण्णांचे बोलणे झाले होते का? तुम्ही असे का करता? विनाकारण तुमच्या अडचणी वाढतील. मी इथे एकाच कारणासाठी आलो आहे. अण्णांचा फोन आला होता. काम बंद करा. यापूर्वी मी येथे येऊन काम बंद केले होते, तेव्हा तुम्ही माझ्यावर एक 'एनसी' दाखल केली. त्यामुळे अण्णांच्या मनात गैरसमज निर्माण झाला होता. तुमची चार-पाच ठिकाणी कामे सुरू आहेत. मी त्याची माहिती काढली आहे.

तुमचे कुठे-कुठे काम सुरू आहे, त्याची माहिती थेट अण्णांना मिळते. मागच्यावेळी काम बंद केले होते. त्यावेळी उपकेंद्राचे काम सुरू होते. त्यावेळी अण्णांनी मला फोन करून हे काम कसे सुरू आहे, याची विचारणा केली होती. तुमच्या एकेका मिनिटाचे रिपोर्टिंग वाल्मीक अण्णांकडे असते. त्यामुळे अण्णांनी केलेली मागणी लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, याकडे लक्षा द्या.

 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Dhananjay Munde News : धक्कादायक बातमी : वाल्मिक कराड अजूनही मुंडेंच्या संपर्कात? राईट हॅण्ड सातपुडा बंगल्यावर...

तुम्हाला इथे काम सुरू ठेवायचे असेल, तर कुणालाही विरोध करा, पण अण्णांना विरोध करू नका. आज संध्याकाळपर्यंत तुमची सगळी कामं बंद करा. आज अण्णा केज तालुक्याला येणार आहेत. तुम्ही तिथे त्यांची भेट घ्या. त्यांच्याशी बोला. म्हणजे तुमच्यावर काम बंद ठेवण्याची वेळ येणार नाही. तुमचे इथे दीर्घकाळ काम चालणार आहे. तुम्ही अण्णांची डीमांड पूर्ण केली, तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडविले जातील.

इथे शंभर जण सांभाळण्यापेक्षा एकाच जागेवर सेटलमेंट राहू द्या. त्यानंतर तुम्हाला कुठेच काही करण्याची गरज पडणार नाही", असा घुलेने दिलेल्या धमकीचा व्हिडिओही पथकाने पुरावा म्हणून जोडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com