Raosaheb Danve, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raosaheb Danve on Shiv Sena : ...तर हातात हात मिळवण्याची तयारी; ठाकरे सेनेबाबत रावसाहेब दानवेंच्या मनात नेमकं काय?

BJP Shiv sena Alliance Uddhav Thackeray with BJP : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जवळीकतेवर मोठं विधान केलं.

Pradeep Pendhare

Shirdi News : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपच्या जवळीकतेवर मोठे विधान केलं आहे. "विकासकामात कुणी हात पुढे करत असेल, तर हातात हात मिळवण्याची भाजपची तयारी", असे दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरेंच्या युतीबाबत चर्चांना उधाण आले.

भाजपचे महाविजय अधिवेशन आज शिर्डी येथे झालं. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ह्या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जवळीकतेवर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दानवे म्हणाले, "राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. आज आमचं बहुमताचं सरकार आहे. आता राजकीय तडजोडीचं काही कारण नाही. विकास कामात कुणी हात पुढे करत असेल, तर हातात हात मिळवण्याची भाजपची तयारी आहे. परंतु उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही".

"उध्दव ठाकरे शिवसेनेच्या विचारापासून दूर गेले आहेत. सत्तेच्या लालसेपोटी वडिलांच्या विचारांना सोडून असंगाशी संगत केली. जनतेचा भ्रमनिरास झाल्याने जनतेने त्यांची साथ सोडली", असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांना लगावला. मतलाबसाठी ते सर्वजण एकत्र आले होते. मतलब साध्य झाला नाही. त्यामुळे आता वेगवेगळे रस्ते पकडताय. शिवसेना एकटी पडली म्हणून स्वबळाची भाषा करत आहे. त्यांच्यासोबत राहायला कुणी तयार नाही', असेही दानवे यांनी म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील माफिया राज वरून भाजपवर टीका केली होती. त्यावर दानवे म्हणाले, "संजय राऊत बरळलेल्या अवस्थेत असतात. ते केव्हा उठतात, काय बोलतात समजत नाही. त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT