Devendra Fadnavis, Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Legislative Assembly: CM फडणवीसांचा जयंत पाटलांना 'थ्री इडियट्स' स्टाईल टोला! 'ऑल ईज वेल' म्हणत अर्थसंकल्पावरील टीकेची हवाच काढली!

Jayant Patil assembly debate News : या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर 'थ्री इडियट्स' स्टाईल टोला लगावत 'ऑल ईज वेल' म्हणत अर्थसंकल्पावरील टीकेची हवाच काढली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधिमंडळात बुधवारी दिवसभर अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. यावेळी विरोधकांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका करीत राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मात्र, या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर 'थ्री इडियट्स' स्टाईल टोला लगावत 'ऑल ईज वेल' म्हणत अर्थसंकल्पावरील टीकेची हवाच काढली.

बुधवारी विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना माजी मंत्री जयंत पाटील आणि सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यात जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळाली. जयंतरावांनी 'फसव्या' आश्वासनांचा पाढा वाचला, तर फडणवीसांनी 'ऑल ईज वेल' म्हणत त्यांना क्लिन बोल्ड केले. अर्थसंकल्पावरून रंगलेला हा दोन नेत्यामधील राजकीय सामना तुफान गाजत आहे. यावेळी जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विधानसभेत बोलताना जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले, 'अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा असून, केंद्राने हात वर केल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे," असा आरोप त्यांनी केला. यावेळी जयंत पाटील यांनी प्रामुख्याने अर्थसंकल्पावर मांडताना र्जय सरकरकडून झालेल्या सर्व काही उणिवा मांडल्या.

त्यानंतर जयंत पाटील यांच्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या आरोपांना उत्तर देताना "थ्री इडियट्स" सिनेमातील संवादाचा वापर केला. "जयंतराव, तुम्ही कितीही भीती दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जनता म्हणतेय 'ऑल ईज वेल'. राज्याची तूट ही मर्यादेतच असून आम्ही विकासाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी फडणवीस यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना झालेल्या उणीवा सर्वासमोर आणल्या. मागील सरकारच्या काळातील आठवण फडणवीसांनी जयंत पाटलांना करून दिली. महाविकास आघाडीच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती कशी होती आणि आता महायुती सरकारने कशा प्रकारे मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत, हे उदारणासह स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT