Congress News : देवाभाऊंची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिव्हारी, 'गेट वेल सून देवेंद्र फडणवीस' म्हणत प्रत्युत्तर!

Congress BJP Political War : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर शेतकरी व आदिवासी जमीन प्रश्नावर हल्लाबोल करत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal reacts strongly to Chief Minister Devendra Fadnavis’ remarks, escalating the political confrontation between Congress and BJP leaders.
Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal reacts strongly to Chief Minister Devendra Fadnavis’ remarks, escalating the political confrontation between Congress and BJP leaders.Sarkarnama
Published on
Updated on

Congress-BJP Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि या नेत्यांमध्ये सध्या शा‍ब्दिक वॉर सुरू आहे. सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलतांना "बिनडोकपणाच्या प्रश्नावर मी उत्तर दिले, तर मी पण बिनडोक ठरेल", असा पलटवार फडणवीस यांनी केला होता. अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांनी सपकाळ यांना बिनडोक ठरवले होते. ही टीका सपकाळ यांच्या चांगलीच जिव्हारी लागली.

सपकाळ यांनी सोशल मिडियावर व्यक्त होत फडणवीसांवर टीका केली आहे. "कोण हर्षवर्धन सपकाळ पासून माझ्यावर वैयक्तिक खालच्या दर्जाला जाऊन केलेली 'फडफड' इथपर्यंतचा फडणवीसांचा प्रवास विनोदी आहे. मला फडणवीस बिनडोक म्हणाले याचे मला बिलकुल आश्चर्य वाटले नाही. कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे आणि बहुजन वर्गाकडे बुद्धिमत्ता नाही, असाच अर्थ त्यातून व्यक्त होतो.

बहुजनांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हीन दर्जाची वागणूक देणे, हीच हजारो वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या व्यक्तींची मानसिकता राहिली आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता, याच विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले गेले, अशीही टीका सपकाळ यांनी केली.

Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal reacts strongly to Chief Minister Devendra Fadnavis’ remarks, escalating the political confrontation between Congress and BJP leaders.
Congress News : काँग्रेस हिंगोलीत कमबॅकच्या तयारीत; प्रज्ञा सातव, अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्षच मैदानात!

मी माझ्या वक्तव्यात महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. आदिवासी समाजाच्या जमिनी ओरबाडून खनिजे काढणे, शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी बळकावून त्यावर शक्तिपीठ महामार्गांसारखे रस्ते उभारणे आणि अदाणी व अंबानी यांसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करणे, हेच काम सध्या राज्य सरकार करत आहे. या मुद्द्यांवर उत्तर न देता देवेंद्र फडणवीस यांनी असंबद्ध टीका केली, अशी खंत सपकाळ यांनी व्यक्त केली.

Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal reacts strongly to Chief Minister Devendra Fadnavis’ remarks, escalating the political confrontation between Congress and BJP leaders.
Shivsena-BJP News: संभाजीनगर जिल्ह्यातील 9 पंचायत समितीवर युतीचा बोलबाला, सर्वाधिक सभापती करत भाजपच ठरला मोठा भाऊ

खरे तर हा सर्व शेतकरी बांधवांचा अपमान आहे. राज्यातील जमीनधारक शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या जमिनी हिसकावून त्यांना देशोधडीला लावणे, हेच भ्रष्ट युती सरकारचे एकमेव ध्येय असल्याचे यावरून दिसून येते. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याविरोधातील आमचा संघर्ष थांबणार नाही. पीडित शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी विधिमंडळात तसेच रस्त्यावरही संघर्ष करण्यास काँग्रेस पक्ष मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com