Devendra Fadanvis and Nawab Malik
Devendra Fadanvis and Nawab Malik Sarkarnama
महाराष्ट्र

तुम्ही गृहमंत्री असताना मलिकांवर कारवाई का केली नाही? फडणवीसांचे १३ शब्दांचे उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक जवळपास रोजच पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातुन समीर वानखेडे आणि भाजपवर वेगवेगळे आरोप करत आहेत. याच पार्श्वभुमीवर आपण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

त्याप्रमाणे आज त्यांनी नवाब मलिकांनी दहशतवाद्यांकडून जमिन खरेदी केली असल्याचा बॉम्ब फोडला आहे. याबाबतची कागदपत्रे आपण योग्य त्या तपास यंत्रणेकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यावर ही जमीन खरेदी करतेवेळी सर्व व्यवहार हे कायदेशीर रित्या झाले आहेत. माझे कोणत्याही अंडरवर्ल्ड माफियांशी संबंध नाहीत, असे स्पष्टीकरण देत अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच फडणवीसांचा आजचा बार फुसका होता आणि उद्या आपण हायड्रोजन बॉंम्ब फोडणार असल्याचा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

मात्र यापलीकडे जावून समाजमाध्यमांवर आता देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला जात आहे. तो म्हणजे आज कारवाईची मागणी करण्याऐवजी ते गृहमंत्री असतानाच त्यांनी मलिकांनी कारवाई का केली नाही? याबाबत त्यांना "तुम्हाला ही कागदपत्र कधी मिळाली? आणि जर ही आधीपासून तुमच्याकडे होती तर मग तुम्ही आधीच कारवाई का केली नाही?" असा उपस्थित एका पत्रकाराने प्रश्न देखील विचारला.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले प्रकरण हे २००५ मधील आहे, आणि त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात स्वत: फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही होते. या प्रश्नावर फडणवीस यांनी हसून अवघ्या १३ शब्दात उत्तर दिले. "माझ्याकडे मिळाली, लगेच मी आपल्यापर्यंत आणली, आधी मिळाली असती आधी कारवाई केली असती" असे उत्तर देत त्यांनी अवघ्या हा प्रश्न मार्गी लावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT