Mumbai News : तुमच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांने प्रसार माध्यमाशी बोलताना मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, असे सांगितले होते. यावर मंत्रीमंडळातील तुमचे तीन लाडके मंत्री कोण आहेत ? असा सवाल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मी लाडका मंत्री अशी योजना सुरु केली आहे. या निकषामध्ये बसतील ते माझे लाडके मंत्री ठरतील.' दरम्यान, या प्रकरणावर मिश्किल टिप्पणी करताना जयंत पाटील म्हणाले की, 'आता या योजनेत सामील होण्यासाठी मंत्र्यांची स्पर्धा लागेल.'
एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नाला उत्तरे दिली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल फडणवीस यांना त्यांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ‘तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे’ असे फडणवीस म्हणाले.
मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राज धर्म पाळायचा असतो. त्यामुळे आपले विचार काय आहेत, आपल्याला काय आवडतं? काय आवडत नाही? हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे.
आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो. की आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे. असं उत्तर यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नाला दिले.
यावेळी त्यांनी एकाच प्रश्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच फडणवीस यांनी त्या प्रश्नावर बोलतं केले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. "काही लोकांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची सवय असते. पण एकदा मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री झालात. तुम्ही लवकर अॅडजस्ट झालात. पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून अॅडजस्ट झाले का?" असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
"पहिले तर तुम्ही जो तीर सोडला आहे तो अजित पवार यांच्या नावाने सोडला आहे हे माझ्या लक्षात आलं. काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे हे जे तुम्ही तुमच्या खास शैलीत म्हणालात ते खरेच आहे. अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहेत. काही लोकं तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असे काही नाही की, त्यांनी उपमुख्यमंत्रीच राहायला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.