Satej Patil And CM Fadnavis On Shaktipeeth Expressway Sarkarnama
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गावरून स्थगन प्रस्ताव! बंटी पाटलांची नकोची भूमिका, फडणवीस 'प्रोजेक्टवर ठाम, पण...'

CM Fadnavis And Satej Patil On Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तिपीठ महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट आहे. जो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला होता. पण फडणवीस मुख्यमंत्री होताच तो पुन्हा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिेले आहेत. यामुळे कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केले आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. 12 जिल्ह्यातील जाणाऱ्या महामार्गाला शेतकरी विरोध करत असून आज (ता.12) शेतकऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी शेतकऱ्यांसह विरोधी महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव आणला. ज्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं असून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर एकवटले आहेत. तर हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय परत जाणार नाही, अशी भूमीका घेतली आहे. तसेच याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारला घेरल स्थगन प्रस्ताव आणला. विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी आणला आणि सरकारची भूमीका काय? असा सवाल केला होता. ज्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला उत्तर देताना, सरकारला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. पण, तो लादायचा नाही, हीच भूमीका सरकारची असल्याचे म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळीच आमदार बंटी पाटील भेटले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर शेतकरीही होते. त्यांनी मार्गाला विरोध असल्याचेही सांगत सह्यांचे निवेदन दिले होते.

चेहरा मोहरा बदणार

यावेळी फडणवीस यांनी या महामार्गामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा विकास होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील जीवन बदलले. तसेच या महामार्गाने देखील जीवन बदलणार आहे. यामुळेच हा महामार्ग शेतकऱ्यांना हवा असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या आंदोलनावर बोलताना, आता ज्या पद्धतीने मोर्चा आला, तेथे कार्यक्रम झाला. त्याचपद्धतीने तिप्पट मोठा कार्यक्रम होईल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. तर या महामार्गासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट भाव दिले असून आता विरोधकांनी देखील मदत करावी असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

यावर आमदार सतेज पाटील यांनी, मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. पण त्यांनी त्याआधी राज्यभरातून आझाद मैदानावर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांची बाजू ऐकायला हवी होती. सगळे नाही तर पाच पन्नास शेतकऱ्यांना बोलवून त्यांची भूमीका जाणून घ्यायला हवी. आज जे आपल्याला सहकार्य करत आहेत. तेच पूर्वी या महामार्गावरून विरोध करत होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने याचा फेरविचार करावा. नक्कीच हा महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण तो रद्दच करावा, अशी आग्रही मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT